Lemon Tea Benefits | लेमन टी प्या आणि स्वस्थ राहा; जाणून घ्या आरोग्यासाठी किती आहे फायदेशीर

| Updated on: May 25, 2021 | 7:45 AM

चहाचा केवळ एक फ्लेवर नाही, तर अनेक प्रकारचे फ्लेवर उपलब्ध आहेत. आरोग्याला अधिक महत्त्व देणारे लोक लेमन टीला पहिली पसंती देतात. (Drink lemon tea and stay healthy; know how beneficial it is for health)

Lemon Tea Benefits | लेमन टी प्या आणि स्वस्थ राहा; जाणून घ्या आरोग्यासाठी किती आहे फायदेशीर
लेमन टी प्या आणि स्वस्थ राहा
Follow us on

मुंबई : चहा म्हटले की अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय. कॉर्पोरेट क्षेत्रात पूर्वी कॉफीला जितके महत्त्व होते, तितकेच महत्त्व आता चहाला आले आहेत. एक कप स्ट्रॉंग चहा अनेक लोकांच्या आयुष्याचा भाग बनला आहे. कुठल्याही महत्त्वाच्या मुलाखती, विशेष चर्चा तसेच पावसाळ्यात एक कप चहा पिण्याला लोक पसंती देतात. मुळात एक कप चहामधून मिळणारा आनंद काही औरच असतो. चहाचा एक कप कुठलाही क्षण विशेष बनवू शकतो. चहाचा केवळ एक फ्लेवर नाही, तर अनेक प्रकारचे फ्लेवर उपलब्ध आहेत. आरोग्याला अधिक महत्त्व देणारे लोक लेमन टीला पहिली पसंती देतात. लेमन टी बनवण्यासाठी तुम्हाला ब्लॅक टीमध्ये लिंबूचा रस पिळून टाकावा लागेल. या चहामध्ये आणखी स्वाद आणण्यासाठी तुम्ही साखर आणि मसाला मिसळू शकता. भारतात काही भागांमध्ये विशेषत: पश्चिम बंगालमध्ये लोक लेमन टीमध्ये काळे मीठदेखील टाकतात. (Drink lemon tea and stay healthy; know how beneficial it is for health)

प्रतिकारशक्ती वाढवते

लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 6, पोटॅशियम आणि मॅग्नीशियम यांसारखे विशिष्ट पोषक तत्त्वे असतात. याची तुम्हाला इम्युनिटी अर्थात प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होईल. याची अ‍ॅलर्जी आणि संक्रमणपासून बचाव करण्यात महत्वपूर्ण भूमिका असेल. चहाच्या पातींमध्ये फ्लेव्होनोइड्स आणि अँटिऑक्सिडेंट्सदेखील असतात. इम्युनिटी वाढवण्यास याची खूप मदत होते.

त्वचेच्या आरोग्य सुधारते

लिंबूमध्ये अ‍ॅस्ट्रिंजेंट गुण असतात. त्वचेसाठी हे एक सुपरफूड आहे. यात अ‍ॅन्टी इन्फ्लेमेटरी गुण आहेत. आपण एका ड्रिंकमध्येदेखील सेवन करू शकता. लिंबूची चहा पिंपल्स घालवतात. त्यामुळे त्वचेचे आरोग्य उत्तम राहते.

वजन नियंत्रणात ठेवते

लेमन टी ची वजन कमी करण्यास खूप मदत होते. शरीर डिटॉक्स करण्यासाठी याची मदत होते. पचन प्रक्रिया चांगली राहिल्यामुळे आपण जे काही जेवतो वा जे पदार्थ खातो, त्यांचे उत्तमरित्या पचन होते. लेमन टीमधील अँटी-इन्फ्लेमेटरी गुण शरीर तंदुरुस्त ठेवण्यास मदत करतात.

तणाव कमी करते

लेमन टी मध्ये फ्लेव्होनोईड्स, पोटॅशियम, मॅग्नेशियम, जिंक, कॉपर आणि अँटिऑक्सिडेंट्सचे पुरेसे प्रमाण असते. याची मेंदू स्वस्थ ठेवण्यास मदत होते. एक कप लेमन टी आपला मूड चांगला बनवतात आणि तणाव कमी करून आरामदायी जीवन प्राप्त करून देतात.

पचन तंत्र

अनेकांना अ‍ॅसिडिटीची त्रास असतो. अशा लोकांनी अ‍ॅसिडिटीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लेमन टीला पहिली पसंती द्यायला हवी. याशिवाय तुम्ही कोणत्याही प्रकारच्या चहामध्ये (दूध न टाकलेल्या) लिंबू पिळून ती चहा पिऊ शकता. या चहामुळे तुमची पचन क्षमता उत्तम राहते. (Drink lemon tea and stay healthy; know how beneficial it is for health)

इतर बातम्या

आधार नंबर बँक खात्याशी लिंक करा आणि निश्चिंत राहा, बँक खात्याचा गैरव्यवहार रोखण्यास होईल मदत

भारतीय लष्करात बलशाली आहेत पॅरास्पेशल फोर्सेज; सर्जिकल स्ट्राईकमधून सिद्ध केलीय ताकद