Skin Care | त्वचेला चमकदार बनवेल ‘हा’ हेल्दी ज्यूस, जाणून घ्या याचे फायदे…

| Updated on: Feb 26, 2021 | 10:31 AM

लोक त्यांच्या त्वचेला चमकदार बनवण्यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न करतात. यासाठी बाजारात बऱ्याच प्रकारची सौंदर्य उत्पादने उपलब्ध आहेत. परंतु, ही उत्पादने आपल्या त्वचेसाठी योग्य ठरतीलच असे नाही.

Skin Care | त्वचेला चमकदार बनवेल ‘हा’ हेल्दी ज्यूस, जाणून घ्या याचे फायदे...
टोमॅटोचा रस
Follow us on

मुंबई : लोक त्यांच्या त्वचेला चमकदार बनवण्यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न करतात. यासाठी बाजारात बऱ्याच प्रकारची सौंदर्य उत्पादने उपलब्ध आहेत. परंतु, ही उत्पादने आपल्या त्वचेसाठी योग्य ठरतीलच असे नाही. कारण त्याचेही अनेक दुष्परिणाम आहेत, जे तुमच्या त्वचेला चमक देणार नाही तर, त्याचे अनेक उलट परिणाम दिसून येतील (Drink tomato juice for healthy and glowing skin).

आपण आपल्या त्वचेची विशेष काळजी घेऊ इच्छित असल्यास आणि आपली त्वचा नेहमीच चमकदार राहावी, असे वाटत असेल, तर त्यासाठी आपण घरगुती उपचारांचा वापर करणे अधिक चांगले. घरगुती उपचार कोणत्याही प्रकारे आपल्या नुकसान करत नाहीत. कारण, ते पूर्णपणे आयुर्वेदिक आहेत आणि आपल्या आरोग्याच्या दृष्टीने ते देखील खूप चांगले आहेत.

नैसर्गिक उपाय

आपल्या त्वचेला चमकदार बनवण्यासाठी आपण एखाद्या घरगुती उपचाराचा पर्याय निवडू शकता. परंतु आपण प्रथमच काहीतरी घरगुती उपचार करण्याचा विचार करत असाल, आणि जर आपल्या मनात काही संकोच असेल तर आम्ही अशा उपायाबद्दल सांगणार आहोत. हा उपाय केवळ खिशासाठी अनुकूल नाही, तर नैसर्गिक आणि निरोगी देखील आहे. चला तर, जाणून घेऊया ‘या’ चवदार उपायाबद्दल…

आपण आपल्या त्वचेबद्दल खूप काळजीत आहात, तिची चमक गमावू इच्छित नसाल आणि चमकणारी त्वचा हवी असेल, तर तुम्ही टोमॅटो वापरू शकता. टोमॅटो हे चवीला काहीसे आंबट असतात, कारण यामध्ये सायटीक अॅसिड असते. याशिवाय टोमॅटोमध्ये प्रोटीन, व्हिटामिन्स, मिनरल्स आणि फायबरची मात्राही भरपूर असते. हे व्हिटामिन ए, व्हिटामिन सी, व्हिटामिन ई आणि व्हिटामिन के चा खूप चांगला स्त्रोत आहे. ही सर्व व्हिटामिन्स आरोग्यासाठी खूप चांगली मानली जातात. आपल्या त्वचेला निरोगी ठेवण्यासाठी आपण नियमित टोमॅटोचा रस पिऊ शकता. चला तर, जाणून घेऊया कसा बनवतात ‘हा’ रस…( Drink tomato juice for healthy and glowing skin)

साहित्य

टोमॅटो

आले

कोथिंबीर

कृती

वरील सर्व साहित्य एकत्र ब्लेंड करा आणि त्याचा रस दररोज सेवन करा.

फायदा

– टोमॅटोचे तुरट गुणधर्म त्वचेवरील अधिकचे सेबम उत्पादन कमी करण्यास मदत करतात आणि ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्सचा प्रादुर्भाव कमी करतात.

– आले त्वचेला टोनकरण्यासाठी तसेच आतड्याचे आरोग्य सुव्यवस्थित ठेवण्यासाठी म्हणून काम करते. तसेच, ते त्वचेच्या आरोग्यावर थेट परिणाम करते.

(टीप : कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Drink tomato juice for healthy and glowing skin)

हेही वाचा :

Jamun Seeds | मधुमेहाच्या रुग्णांसाठी संजीवनी ठरतील जांभळाच्या बिया, ‘या’ समस्यांवरही उपयोगी!

Food Habits | वजन नियंत्रण व प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहाराचे ‘हे’ पाच नियम पाळा!