मुंबई : चहा पिणे कोणाला आवडत नाही? काम करणारे लोक चहाचे सर्वाधिक सेवन करतात. कारण, चहामधील कॅफिनचे प्रमाण तुम्हाला सक्रिय ठेवण्यास मदत करते. पण, जास्त चहा पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्याहीपेक्षाही रिकाम्या पोटी चहा पिणे अधिक हानिकारक आहे. सकाळी उठल्याबरोबर बर्याच लोकांना चहाची तलफ येते. जर, चहा मिळाला नाही, तर लोकांचे डोके दुखू लागते. म्हणून, नुसता चहा पिण्याऐवजी, चहाबरोबर थोडा हलका फुलका नाश्ता देखील करावा, असा सल्ला नेहमी दिला जातो. केवळ चहा न पिता, त्यासोबत काही खाल्ल्यास शरीराला इजा होत नाही. पण, रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने काय नुकसान होते, हे आपल्याला माहिती आहे का? (Drinking tea on empty stomach causes lots of health problem)
लठ्ठपणा या समस्येमुळे बरेच लोक त्रासलेले आहेत. परंतु, तरीही ते आपल्या खाण्यांच्या सवयींमध्ये अजिबात तडजोड करू इच्छित नाहीत. रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने, त्यात विरघळलेली साखरदेखील शरीरात जाते. ज्यामुळे वजन वाढते आणि लठ्ठपणाची समस्या निर्माण होते.
बर्याच लोकांना सांधेदुखीची समस्या असते. यामागील एक मोठे कारण म्हणजे चहा! चहा पिण्यामुळे आपल्या हाडांमध्ये वेदना होतात आणि दातही पिवळसर पडू लागतात.
काम करणारे लोक ताजेतवाने राहण्यासाठी चहाचे जास्त सेवन करतात. त्यामुळे अशा व्यक्तींच्या शरीरात कॅफिनचे प्रमाण लक्षणीय वाढते आणि त्यांचे मन खूप उत्साही होते. मात्र, यामुळे झोप देखील व्यवस्थित येत नाही. रिक्त पोट किंवा जास्त चहा पिण्यामुळे ताण आणि नैराश्यासारख्या समस्या उद्भवतात (Drinking tea on empty stomach causes lots of health problem).
कित्येक लोकांना गरमागरम, कडक चहा पिणे आवडते. परंतु, सकाळच्या वेळी गरम चहा पिण्यामुळे पोटाच्या आतील पृष्ठभागावर इजा होते, ज्यामुळे पोटात हळूहळू अल्सरची समस्या उद्भवते.
बरेच लोक नेहमी सकाळी सकाळी रिकाम्या पोटी चहाचा कप रिचवतात. त्याबरोबर काहीही खात नाहीत, ज्यामुळे पोटात गॅसचा त्रास होतो आणि पचनशक्ती कमी होते. रिकाम्या पोटी चहा प्यायल्यामुळे, पित्त प्रक्रियेत अडथळा येतो. ज्यामुळे आपल्याला मळमळल्यासारखे आणि चिंताग्रस्त वाटू शकते.
चहा पिण्यामुळे चपळता येते, असे म्हटले जाते. परंतु, सकाळी दूधयुक्त चहा प्यायल्याने दिवसभर थकवा येतो आणि कामात चिडचिड होऊ लागते.
रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने हृदयाची गती वाढते. ज्यामुळे हृदयविकाराची समस्य निर्माण होण्याची शक्यता असते.
(Drinking tea on empty stomach causes lots of health problem)
International Tea Day | भारतात चहाची सुरुवात कशी झाली? जाणून घ्या तुमच्या चहाचा रंजक इतिहासhttps://t.co/sdO3l0ca5o#InternationalTeaDay
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 15, 2020