नवी दिल्ली – त्वचा हा आपल्या शरीराचा सर्वात नाजूक आणि संवेदनशील भाग असतो. मात्र याच त्वचेच्या समस्या (skin problem)अनेकदा त्रासदायक असतात, उदाहरणार्थ – सुरकुत्या पडणे (wrinkles on face) आणि बारीक रेषा. हे वृद्धत्वाशी संबंधित असते. त्याची अनेक कारणे असू शकतात. या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्हाला अनेक उत्पादने बाजारात मिळतील. परंतु, ती उत्पादने त्वचेसाठी हानिकारक (bad for skin) ठरू शकतात. जर तुम्हाला कमी वयात सुरकुत्या पडण्याची समस्या असेल तर त्यासाठी काही वाईट सवयी कारणीभूत ठरत असू शकतात. चहा किंवा कॉफीच्या अधिक सेवनामुळेही हे होऊ शकते.
सुरकुत्या कशामुळे पडतात, त्या काही चुकीच्या सवयींबद्दल जाणून घेऊया.
आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे हे नैसर्गिक आहे. मात्र कमी वयातच असे होत असेल तर ते आपल्या काही सवयींमुळेही होऊ शकते. आपल्या लाइफस्टाइलमध्ये बदल करून आणि काही चुकीच्या सवयी सोडून आपण ही समस्या कमी करण्याचा प्रयत्न करू शकतो.
सन एक्स्पोजर – दीर्घकाळ सूर्यप्रकाशात राहणे हे आपल्या त्वचेसाठी हानिकारक आहे. यामुळे आपली त्वचा टॅन होते तसेच कोरडी होऊ शकतेच पण उन्हामुळे सुरकुत्याही पडू शकतात. त्यामुळे सूर्याच्या संपर्कात येण्यापूर्वी त्वचा झाकली जाईल असे कपडे घाला. सनस्क्रीनचा वापर करा.
खराब आहार – योग्य आहार न घेतल्यानेही हा त्रास वाढू शकतो. जास्त साखर, जंक फूड किंवा प्रक्रिया केलेले पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्याने सुरकुत्या पडण्याचा धोका वाढू शकतो. म्हणूनच आहाात बदल करून फळे, भाज्या, संपूर्ण धान्य इत्यादी योग्य व पौष्टिक आहार घ्यावा.
धूम्रपान आणि मद्यपान – धूम्रपान व मद्यपान हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय धोकादायक असते. जास्त धूम्रपान आणि मद्यपान केल्याने लोकांच्या त्वचेच्या गुणवत्तेवर परिणाम होतो आणि अकाली सुरकुत्या येऊ शकतात. ही वाईट सवय वेळीच सोडलेली चांगली ठरते.
बराच वेळ मेकअप न काढणे – जर तुम्ही बराच वेळ चेहऱ्यावरील मेकअप काढला नाही तर त्वचेचा नैसर्गिक पोत खराब होतो, त्याची हानी होते. ज्यामुळे सुरकुत्या पडू शकतात. त्यामुळे चेहऱ्यावर जास्त वेळ मेकअप ठेवू नये.
कमी झोप – पुरेशी झोप घेणे हे प्रत्येकासाठी खूप महत्वाचे आहे. जर तुमची झोप नीट झाली नाही तर तुम्हाला आरोग्यासंदर्भात अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे सुरकुत्याही येऊ शकतात. म्हणूनच रोज किमान सहा ते आठ तासांची झोप घेणे आवश्यक ठरते.
( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)