मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आता 70 वर्षांचे आहेत. परंतु त्यांचा फिटनेस आणि उर्जा पातळी एखाद्या तरुणापेक्षा कमी नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून ते सुट्टी न घेता अविरत काम करत आहेत. तसेच ते फार लवकर आजारी पडत नाहीत, म्हणजेच त्यांची रोगप्रतिकार शक्तीदेखील खूप मजबूत आहे. म्हणूनच सगळ्यांनाच त्यांच्या या वयातील तंदुरुस्तीचे रहस्य जाणून घ्यायचे असते. पंतप्रधान मोदींच्या सर्वांगीण तंदुरुस्तीबद्दल बोलताना त्यांच्या खाण्यापासून त्यांच्या शारीरिक व्यायामांसह अनेक गोष्टींचा विचार केला पाहिजे. यात सगळ्यात त्यांच्या आहारात सामील घटकांपैकी महत्वाचा घटक आहे ‘शेवगा’ (Drumstick health food recipes).
फिट इंडिया अभियानाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाइन कॉन्फ्रेंसमध्ये बोलताना शेवग्याच्या पराठाचा उल्लेख केला होता. त्यांनी आपल्या तंदुरुस्तीचे रहस्य उघड करत सांगितले की, आठवड्यातून किमान दोनदा शेवग्याच्या शेंगाचे पराठे खायला हवेत. आणि मी आहारात शेवगा नेहमी घेतो. तुम्हाला देखील पंतप्रधान मोदींप्रमाणे फिट राहायचे असेल, तर चला जाणून घेऊया शेवग्याचे फायद्यांविषयी आणि त्याच्या सर्व पाककृतींविषयी…
शेव्ग्यामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे आहेत. तसेच, त्यात अँटिऑक्सिडेंट गुणधर्म आहेत, जे पेशी खराब होण्यापासून संरक्षण करतात आणि रोगप्रतिकारक शक्ती सुधारतात. या व्यतिरिक्त, शेवगा सांधेदुखी, लठ्ठपणा, दमा, डोकेदुखी, उच्च रक्तदाब, मायग्रेन, पोटाच्या समस्या आणि सर्व आजारांपासून आराम देते आणि आपले संरक्षण करते.
डोळ्याच्या आणि त्वचेच्या सर्व समस्यांपासून शेवगा आपले संरक्षण करते. शेवग्याच्या शेंगेच्या सेवनामुळे प्रसूती दरम्यान जास्त वेदना होत नाहीत. म्हणजेच, फक्त या एका गोष्टीचे सेवन केल्याने सर्व आजारांपासून तुमचे रक्षण होऊ शकते. शेवग्याचा उपयोग केवळ पराठा बनवण्यासाठीच केला जात नाही तर त्याचे इतरही अनेक पदार्थ तयार करता येतात.
सर्वप्रथम, एक कप शेवग्याची पाने स्वच्छ धुवून घ्या. आता ही पाने बारीक कापून यात दोन वाट्या पीठ, लसूण आले पेस्ट, चिरलेली हिरवी मिरची, मीठ, गरम मसाला, लाल तिखट आणि जिरे घाला व्यवस्थित मिक्स करून, पीठ मळून त्याचे पराठे बनवा (Drumstick health food recipes).
या भाजीसाठी दोन कांदे, 5 लसुण पाकळ्या, हिरव्या मिरच्या, टोमॅटो, हिंग, हळद, मीठ, गुळ आणि तेल हे साहित्य लागेल. याची भाजी बनवण्यासाठी शेवग्याची फुले धुवुन घ्यावीत. तेलावर लसुण पाकळ्या, मिरचीची फोडणी देउन त्यावर कांदा परता. कांदा जास्त शिजवण्याची गरज नसते. मग त्यात हिंग, हळद घालुन शेवग्याची फुले घाला. परतुन एक वाफ घ्या. मग त्यात चिरलेला टोमॅटो, मिठ, गुळ घाला. एक वाफ काढा आणि चांगले परतुन घ्या. झाली भाजी तयार.
शेवग्याच्या शेंगाचे तुकडे करून ते उकडून घ्या. आता कढईत तेल गरम झाल्यावर त्यात जिरे आणि हिरवी मिरची घाला, त्यात एक वाटी बेसन पीठ घाला आणि भाजून घ्या. जेव्हा बेसनाचा रंग बदलेल, तेव्हा त्यात उकडलेल्या शेंगा टाकून व्यवस्थित ढवळा. आता धणे पूड, हळद, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घाला. त्यात एक चमचा आमचूर पावडर मिसळा आणि पाणी घाला. दोन ते तीन मिनिटे ही भाजी शिजवा. पाणी आणि मसाले व्यवस्थित मिसळले की गॅस बंद करा.
(Drumstick health food recipes)
Narendra Modi | मोदींचा फिटनेस मंत्र तुम्हाला माहितीये का?https://t.co/A1wk5o4uS5 #NarendraModi #fitness
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 27, 2020