त्वचेचं सौंदर्य अन् बरच काही… महिलांनी दररोज सुकं खोबरे का खायला हवे? फायदे जाणून आश्चर्य वाटेल

| Updated on: Dec 03, 2024 | 3:55 PM

रोजच्या धकाधकीत आयुष्यात महिलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. पण सुके खोबरे हा घरगुती आणि सोपा उपाय ज्यामुळे महिलांच्या बऱ्याच समस्या दूर होतात. महिलांनी रोज सुखे खोबरे खाल्ले तर त्याचे काय परिणाम त्यांच्या शरिराव होतात हे जाणून नक्कीच आश्चर्य वाटेल.

त्वचेचं सौंदर्य अन् बरच काही... महिलांनी दररोज सुकं खोबरे का खायला हवे? फायदे जाणून आश्चर्य वाटेल
Follow us on

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात नोकरी आणि घर सांभाळताना स्त्रियांची तारेवरची कसरत होते. त्यामुळे त्यांना स्वत:च्या आरोग्याची हवी तशी काळजी घेण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे बऱ्याचदा काही आजार हे महिला अंगावर काढतात. आणि भविष्यात त्यांना त्याचा त्रास होतो. शिवाय दिवसेंदिवस त्याची ऊर्जाही कमी होऊ लागते. पण त्यासाठी घरगुती उपाय करतही महिला त्याच्या शरिराची काळजी घेऊ शकतात. अगदी स्वयंपाक करता करताही महिला हा पदार्थ खाऊ शकतात.

प्रत्येकाच्या किचनमध्ये असणारं सुखे खोबरे. भाजीचे वाटण असो किंवा बिर्य़ाणीत तळून घालण्यासाठी असो त्यामुळे जेवण हे रुचकर होतचं. त्याचाच उपयोग करून महिला आपल्या आरोग्याची काळजी घेऊ शकतात. ते म्हणजे सुखे खोबरे. स्त्रियांसाठी तर अतिशय फायदेशीर आहे सुकं खोबरं. कसं ते जाणून घेऊयात.

सततची कामामुळे आणि पुरेशी विश्रांती न मिळाल्यामुळे शारीरिक आणि मानसिक ताण येतो. यामुळे याचे रुपांतर पुढे जाऊन गंभीर आजारात होते. त्यामुळे महिलांना जर स्वत:ला या त्रासापासून दूर ठेवायचं असेल तर त्यांच्यासाठी सुकं खोबरं हे एखाद्या औषधापेक्षा कमी नाहीये.

हृदयविकाराचा धोका कमी होतो
दररोज सुकं खोबरं खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो. हार्ट ॲटॅक, किंवा ब्लॉकेजेसचाही धोका टाळता येतो.थंडीमध्ये तर आवर्जून सुखं खोबरे खायला हवे.

गरोदरपणात सुकं खोबरं फायदेशीर

महिलांनी गरोदरपणात तर आवर्जून सुकं खोबरं खायला हवं. कारण त्याचे अनेक फायदे आहेत. खोबऱ्यात असलेलं फॅटी ॲसिड फक्त महिलांसाठीच नाही तर पोटातल्या गर्भाच्या वाढीसाठी फायद्याचे ठरतात. खोबऱ्यामुळे गरोदर महिलांची प्रतिकारशक्तीही वाढते.

त्यानंतर महिलांमध्ये युरिन इन्फेक्शन म्हणजेच (UTI) चा त्रास सतत पाहायला मिळतो. ज्या महिलांना वारंवार युटीआयचा त्रास होतो अशा महिलांनी सुकं खोबरं खाणं फायद्याचं आहे. सुक्या खोबऱ्यात असलेले पोषक घटक शरीरात खराब बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करतात. त्यामुळे UTI सारख्या गंभीर समस्यांना दूर ठेवता येऊ शकतं.

संधिवाताची समस्या कमी होते 

वयाच्या तिशीनंतर तसेच जास्त प्रवासामुळे किंवा सतत स्वयंपाक घरात उभे राहून काम केल्याने अनेक महिलांमध्ये कॅल्शियमची कमतरता दिसून येते त्यामुळे सांधेदुखीचा त्रास सुरू होतो. कधीकधी या त्रासाचं रूपांतर संधिवातासारखा गंभीर आजारातही होतं. त्यामुळे ज्यांना महिला आणि पुरूषांनाही संधिवाताचा त्रास होत असेल त्यांच्यासाठी सुकं खोबरं नक्कीच खायला हवं. खोबऱ्यातल्या कॅल्शियममुळे हाडं मजबूत होतात आणि सांधेदुखीचा त्रासही कमी होतो.

उत्तम झोप येण्यासाठी

तुमची झोप पुरेशी होत नसेल किंवा झोप नीट लागत नसेल तर झोपायला जाण्याआधी सुखे खोबरे खा. नक्कीच झोप येण्यास मदत होईल शिवाय सकाळी पोटही साफ होईल.

रक्तवाढीसाठी सुखे खोबरे फायद्याचे

सुक्या खोबऱ्यात अँटी-ऑक्सिडंटचे प्रमाण जास्त असते. यामुळे रक्तातील लोहाचे प्रमाण वाढतं. त्यामुळे शरीरातल्या रक्ताचं आणि हिमोग्लोबिनचं प्रमाणही वाढंत. त्यामुळे ज्यांना रक्ताची कमी जाणवत असेल तर त्यांनी सुकं खोबरं नक्कीच खाल्ल पाहिजे.

त्वचा होते चमकदार

ज्यांची त्वचा कोरडी आहे किंना थंडीमुळे कोरडी झाली असेल तर त्वचेला आवश्यक पोषण देण्यासाठी, त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी सुखे खोबरे मदत करते. सुख्या खोबऱ्यामुळे त्वचा हायड्रेट राहते शिवाय मुलायम आणि तजेलदार बनते. सुख्या खोबऱ्याचा थंडीमध्ये जास्त फायदा होतो.