मुंबई : प्रत्येकजण आपल्या लाईफमध्ये व्यस्त झालं आहे. दररोज काम, धावपळ, दगदग अशा अनेक गोष्टींचा सामना सध्याच्या लोकांना करावा लागत आहे. त्यामुळे ते स्वतःच्या आरोग्याकडे नीट लक्षही देत नाहीत. त्यामुळे लोकांना वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागतो. मग अशक्तपणा येणे, शरीरातील कॅल्शियम कमी होणे अशा समस्यांचा सामना करावा लागतो.
तर तुम्ही कॅल्शियम वाढवण्यासाठी डॉक्टरांकडे जात असाल पण आज आपण असे काही हेल्थी टिप्स जाणून घेणार आहोत ज्यामुळे कॅल्शियम वाढण्यास मदत होईल. तुम्हाला माहिती आहे का की आपल्या काही सवयींमुळे किंवा जीवनात बदल करून आपण कॅल्शियमची कमतरता दूर करू शकतो. तर आज आम्ही तुम्हाला काही उत्तम हेल्थ केअर टिप्स सांगणार आहोत.
जर तुमचं काम डेस्कवर बसून असेल तर तुम्हाला शरीराची हालचाल करणं आवश्यक आहे. कामातून मध्ये ब्रेक घेऊन थोडे चालण्याचा प्रयत्न करा. तसेच दररोज शरीराची हालचाल करणं गरजेचं आहे. त्यामुळे आपले शरीर फिजीकली ॲक्टीव्ह राहते.
आपल्या शरीरात पाण्याची कमतरता भासू द्यायची नसते. जर तुम्ही कमी प्रमाणात पिलं तर शरीरात डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे आपण दिवसातून किमान 3 लिटर पाणी प्यावे. तसेच सकाळी नाश्त्यात दिवसातून एकदा हिरव्या भाज्या आणि दुग्धजन्य पदार्थ खावे. यामुळे कॅल्शियमची कमतरता दूर होण्यास मदत होईल.
सध्याच्या काळात प्रत्येकजण फोनवर जास्त वेळ घालवताना दिसतात. यामुळे आपण आपल्या जवळच्या लोकांना जास्त टाईम देत नाही. त्यांच्याशी आपण फोनवरच संपर्क साधतो. पण तसं न करता आपण ऑफलाइन म्हणजे लोकांना भेटून वेळ घालवू शकता. ही पद्धत तुम्हाला मानसिकदृष्ट्या फ्री आणि चांगलं फील करेल.
प्रत्येकाने आयुष्यात दररोज नवनवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी प्रयत्न करणे आणि यश मिळवणे ही चांगली सवय आहे. पण यश मिळाल्यानंतर तर गोष्टी शिकणे सोडू नये.
लोक आपल्या कामामुळे नीट झोप घेत नाहीत. पण अपुऱ्या झोपेमुळे तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या आजारी पडू शकता. त्यामुळे प्रत्येकाने नेहमी 7 ते 8 तास झोपण्याची सवय लावली पाहिजे.