Black Walls Clean | बहुतांश घरात (home) देवाची पूजा-अर्चा करताना समई किंवा दिवा आणि उदबत्ती लावली जाते. उदबत्तीच्या धुरामुळे आपल्या घरादारातील भिंतीही (black walls) काळवंडतात. धुरामुळे काळ्या झालेल्या भिंती खराब तर दिसतातच पण त्यामुळे घराचा लूक बिघडतो आणि सौंदर्यावरही परिणाम होतो. घरातील काळ्या झालेल्या भिंती साफ आणि स्वच्छ करून आधीसारख्या कशा चमकवाव्यात असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना ? चला जाणून घेऊयात उपाय..
वॉशेबल पेंटच्या मदतीने कोणतीही गोष्ट स्वच्छ करता येते हे तुम्हाला माहीत आहे का ? हाच त्याचा विशेष गुण आहे. जर तुम्ही तुमच्या घरात वॉशेबल पेंट लावला असेल, तर भिंत काळी झाल्याची चिंता करू नका. उदबत्तीच्या धुरामुळे काळवंडलेली भिंत तुम्ही साबण आणि स्क्रबच्या मदतीने सहजपणे स्वच्छ करून पूर्वीसारखी चमकवू शकता.
टूथपेस्टचा वापर केवळ दात स्वच्छ करण्यासाठीच नव्ह तर इतर कामांसाठीही होऊ शकतो. उदबत्तीच्या धुरामुळे काळवंडलेल्या भिंती तुम्ही जेल टूथपेस्टच्या मदतीने सहज स्वच्छ करू शकाल. जर तुमच्या घरात जेल टूथपेस्ट नसेल तर तुम्ही ती बाजारातून विकत आणू शकता. रंगावर लागलेले डाग, काळ्या भिंती या जेल टूथपेस्टच्या मदतीने अगदी सहजपणे, स्वच्छ होऊ शकतात, हे जाणून तुम्ही हैराण व्हाल. एका स्वच्छ कापडावर थोडी जेल टूथपेस्ट घ्या आणि भिंतीचा जो भाग काळवंडला आहे, किंवा खराब झाला आहे, तिथे कापडाने घासावे. भिंत स्वच्छ होईल.
याशिवाय उदबत्तीच्या धुरामुळे काळवंडलेल्या भिंती तुम्ही भांडी घासायच्या साबणानेही स्वच्छ करू शकता. हे डाग साफ करण्यासाठी भांडी घासायचा साबण (Dish soap) आणि व्हिनेगरचाही वापर करू शकता. त्यासाठी 1 कप पाण्यामध्ये 1 चमचा लिक्विड डिश सोप आणि पांढरे व्हिनेगर घालून चांगले मिक्स करावे. त्यानंतर तयार झालेल्या मिश्रणात स्क्रब बुडवावे व ते भिंतीवर घासून काळे डाग साफ करावेत. त्याशिवाय तुम्ही कपडे धुण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या डिटर्जंटच्या सहाय्यानेही काळ्या भिंती स्वच्छ करू शकता.