मुंबई : द्राक्षे हे एक असं फळ आहे जे बहुतेक लोकांना खायला आवडते. द्राक्षे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जातात. द्राक्षात आढळणारी पोषक तत्त्वे शरीरासाठी खूप फायदेशीर मानली जातात. द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन ए बरोबर व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी, पोटॅशियम आणि कॅल्शियम देखील भरपूर प्रमाणात आढळतात. द्राक्षामध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि शक्तिशाली अँटी-ऑक्सिडंट घटक देखील असतात, जे शरीराला बर्याच समस्यांपासून वाचविण्यात उपयुक्त मानले जातात. एवढेच नाही तर द्राक्षांमध्ये बरीच पोषक द्रव्ये कॅलरी, फायबर, ग्लूकोज, मॅग्नेशियम आणि लिंबाच्या रसामध्ये सापडणारे आम्ल देखील उपलब्ध असतात. द्राक्षे खायला जितकी चवदार आहे तितकेच आरोग्यासाठी फायद्याचे आहे. त्यामध्ये उपस्थित अँटी-ऑक्सिडंट्स हार्ट अटॅक, रक्ताच्या गुठळ्या होणे आदि समस्यांपासून बचाव करतात. एवढेच नव्हे तर कोलेस्टेरॉलला नियंत्रणात ठेवण्यासही त्यांना उपयुक्त मानले जाते. द्राक्षे खाल्ल्याने शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासही मदत होते. (eat grapes to prevent diabetes, constipation, heart disease)
हृदयाचे आरोग्य लाभदायक
द्राक्षे हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. द्राक्षांमध्ये असलेले पोषक तत्व हृदयाच्या आजारापासून बचाव करण्यास मदत करतात. एका संशोधनानुसार, स्तनाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी द्राक्षाचे सेवन फायदेशीर ठरू शकते.
रक्तदाब नियंत्रित राहते
द्राक्षाचे सेवन केल्यामुळे रक्तदाब नियंत्रित केले जाऊ शकते. उच्च रक्तदाबाची समस्या असलेल्या रुग्णांसाठी द्राक्षे अधिक फायदेशीर ठरते. द्राक्षाचा डाएटमध्ये समावेश केल्यास रक्तदाबावर नियंत्रण मिळवू शकतो.
कँसरपासून बचाव करते
कँसरसारख्या धोकादायक आजारापासून बचाव करायचा असल्यास द्राक्षाचे सेवन करणे आरोग्यादायी आहे. द्राक्षामध्ये ग्लुकोज, मॅग्नेशिअम आणि सायट्रिक अॅसिड सारखी अनेक पोषक तत्वं असतात. जे कँसर आणि ब्लड-इंफेक्शन सारख्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपयुक्त होऊ शकते.
डोळ्यांसाठी उपयुक्त
द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन ‘ए’ मोठ्या प्रमाणात असते, जे डोळ्यांसाठी अतिशय लाभदायी असते. डोळ्यांशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी तुमच्या डाएटमध्ये द्राक्षांचा समावेश करु शकता.
बद्धकोष्ठतेपासून मुक्तता मिळते
जर तुम्ही बद्धकोष्ठतेच्या समस्येने त्रस्त असाल तर द्राक्षांचे सेवन जरुर करा. बद्धकोष्ठतेव्यतिरिक्त वजन वाढवण्यासाठी द्राक्षांचा डाएटमध्ये समावेश करु शकता. शरीराने बारीक असलेल्यांसाठी द्राक्षाचे सेवन फायदेशीर ठरू शकते.
मधुमेहावर उपयुक्त
मधुमेह ही सध्या एक गंभीर समस्या आहे. मधुमेह रूग्णांना बर्याच गोष्टी खाण्यास मनाई आहे. मधुमेहाच्या रुग्णांना द्राक्षाचे सेवन फायदेशीर मानले जाते. द्राक्षे शरीरातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करू शकतात. (eat grapes to prevent diabetes, constipation, heart disease)
विराट कोहलीच्या पावलावर पाऊल, पाकिस्तानच्या बाबर आझमचा PSL मध्ये किर्तीमानhttps://t.co/DE9gb1QoG1
| #IPL | #PSL | #ViratKohli | #BabarAzam |
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 21, 2021
इतर बातम्या
Hair Care Tips| केसांच्या आरोग्यासाठी मेथीचे दाणे लाभदायी, जाणून घ्या काही खास टिप्स
Bigg Boss 14चा आज महाअंतिम सोहळा, कोण होणार विजेता?, कसा असेल सोहळा; वाचा!