नवी दिल्ली – चांगल्या आरोग्य हवे (good health) असेल तर त्यासाठी अनेक जीवनसत्त्वे (vitamins) आवश्यक असतात. शरीरात पोषक तत्वांची कमतरता असल्यास अनेक प्रकारचे आजार बळावू शकतात. मात्र, योग्य आहार घेऊन व्हिटॅमिन्सची ही कमतरता भरून काढता येऊ शकते. आज आपण व्हिटॅमिन-सी (vitamin-C) बद्दल जाणून घेऊया, जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. व्हिटॅमि-सी हे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते, ज्यामुळे सर्दी-खोकला, सर्दी आणि इतर अनेक प्रकारचे संक्रमण टाळणे शक्य होते. व्हिटॅमिन-सीची कमतरता दूर करण्यासाठी आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करावा, हे जाणून घेऊया.
1) ब्रोकोली
ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन-सी मुबलक प्रमाणात आढळते. तसेच त्यामध्ये कॅल्शियअम, फायबर, पोटॅशिअम, व्हिटॅमिन-ए आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात. ब्रोकोली खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते, ज्यामुळे अनेक आजारांपासून बचाव होतो.
2) संत्रं
संत्र्यामध्ये व्हिटॅमिन-सी भरपूर प्रमाणात असते. तसेच फायबर, व्हिटॅमिन-ए, पोटॅशिअम यासह इतर अनेक पोषक घटकही आढळतात, जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. तुम्ही रोजच्या आहारात संत्र्याचे सेवन करू शकता किंवा त्याचा रस देखील पिऊ शकता.
3) आवळा
आवळा हा चवीला आंबट आणि तुरट असला तरी तो आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यामध्ये व्हिटॅमिन-सी यासह फायबर, पोटॅशिअम, ओमेगा-3 फॅटी ॲसिड्स मुबलक प्रमाणात असतात. तुम्ही कच्चा आवळाही खाऊ शकता. किंवा तुम्ही त्याचा ज्यूस देखील पिऊ शकता.
4) भोपळी मिरची
भोपळी मिरचीमध्ये भरपूर पोषक तत्वं असतात. त्यात व्हिटॅमिन-सी, ए, के आणि बीटा कॅरोटीन हे देखील असते. भोपळी मिरचीच्या सेवनाने शरीरातील व्हिटॅमिन-सीची कमतरता दूर होते. सॅलॅड, भाजी किंवा इतर पदार्थांच्या स्वरूपात तुम्ही भोपळी मिरची खाऊ शकता.
5) स्ट्रॉबेरी
एक चविष्ट असे फळ असलेल्या स्ट्रॉबेरीमध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात. स्ट्ऱॉबेरी ही कोलेस्ट्रॉलची समस्या टाळते. त्यामध्ये व्हिटॅमिन-सी सोबत फायबर, पोटॅशिअम, फोलेट असते. जे अनेक आजारांवर उपचार करण्यास फायदेशीर आहे.
( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)