नवी दिल्ली | 8 ऑगस्ट 2023 : व्हिटॅमिन ई (vitamin E) हे असे पोषक तत्वं आहे जे केवळ आपल्या शरीरासाठीच आवश्यक नाही तर त्वचेसाठीही खूप उपयोगी ठरते. व्हिटॅमिन ई मुळे इम्युनिटी (immunity) वाढते, तसेच डोळ्यांनांही फायदा होतो. हे एक पॉवरफुल अँटीऑक्सीडेंट आहे, ज्यामुळे त्वचेच्या पेशी निरोगी ठेवतात आणि फ्री रॅडिकल्सपासूनही संरक्षण होते, ज्यामुळे त्वचा तरूण (glowing and young skin)राहते. आजकाल बरेच लोक चमकदार त्वचा मिळवण्यासाठी व्हिटॅमिन ई कॅप्सूल वेगेवगळ्या पद्धतीने चेहऱ्यासाठी लावतात. मात्र काही पदार्थांचा आहारत समावेश केला तर आतूनच व्हिटॅमिन ई कमतरता भासणार नाही आणि त्वचा तरूण राहील.
आपण काहीही खातो तेव्हा त्यातील पोषक घटक शरीराला आतून पोषण देतात. ज्यामुळे आपण आतून निरोगी राहतो आणि त्याचा चांगला परिणाम आपल्या त्वचेवरही दिसून येतो. व्हिटॅमिन सी समृद्ध असलेल्या गोष्टी खाल्ल्याने आरोग्याला फायदे तर मिळतीलच पण त्यासोबतच त्वचाही नैसर्गिकरित्या चमकदार होईल. त्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा ते जाणून घेऊया.
बदाम
हाय न्यूट्रिएशन व्हॅल्यू असणाऱ्या बदामांमध्ये व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात आढळते. हेल्दी त्वचा हवी असेल तर रोजच्या आहारात बदामाचा समावेश करावा. पण त्यांची प्रकृती उष्ण असते, त्यामुळे ते अती प्रमाणात खाऊ नयेत. बदाम रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी खाल्ले तर त्याचा जास्त फायदा होतो.
बीट
बीच हे त्वचा आणि हेल्थसाठी अतिशय फायदेशीर असते. तसेच त्याच्या पानांमध्येही व्हिटॅमिन ई आणि पोषक तत्व मुबलक असतात. बीटाच्या पानांची भाजी बनवून खाता येते. त्यामुळे चेहरा चमकदार आणि गुलाबी होतो.
पालक
पालकामध्ये लोह तर असतेच पण बरेच मिनरल्स आणि ई व्हिटॅमिनसह अनेक व्हिटॅमिन असतात. पालकाचा आहारात समावेश केल्यास बराच फायदा होतो.
सूर्यफुलाच्या बिया
आहारात सूर्यफुलाच्या बियांचा समावेश केल्यास शरीरातील व्हिटॅमिन ईची कमतरता पूर्ण होऊ शकते.सुमारे 100 ग्रॅम सूर्यफुलाच्या बियांमध्ये 35.17 मिलीग्राम व्हिटॅमिन ई असते. निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी सूर्यफुलाच्या बिया खूप फायदेशीर ठरतात.
ॲवाकॅडो
व्हिटॅमिन ई साठी आहारात ॲवाकॅडोचा नियमित समावेश करणे हा उत्तम पर्याय आहे. त्यामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्मही असतात. ज्यामुळे चेहऱ्यावर कमी वयातच सुरकुत्या येण्याची भीती रहात नाही आणि चेहरा तरूण दिसतो.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)