मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता हिला आपली फिटनेसची प्रचंड काळजी आहे. ती नियमित योग करत असते. इतकेच नव्हेतर ती सोशल मीडियावर योगा टिप्सही सांगत राहते आणि चमकदार त्वचेसाठी आपण कोणता योगा करावा, हे देखील नेहमी सांगत असते. आपल्या चमकदार त्वचेसाठी ती कोणते उपाय करते, हे देखील ती सगळ्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. अलीकडेच तिने तिच्या सिक्रेट फेस मास्कबद्दल देखील सोशल मीडियावर शेअर केले होते (Esha Gupta Shares Hair Mask Recipe).
ईशाने ऑर्गनिकपद्धतीने फेस मास्क बनवण्याची रेसिपी तयार केली होती, जी तिने सोशल मीडियावरही शेअर केली. आता पुन्हा एकदा तिने असेच एक सिक्रेट शेअर केले आहे.
यावेळी ईशाने सोशल मीडियावर हेअर मास्कसंदर्भात काही गोष्टी शेअर केल्या आहेत. स्वत: ला निरोगी ठेवण्यासाठी ईशा खूप काही करत असते. तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. यात ईशाने आपल्या चमकदार केसांचं रहस्य सांगितलं आहे. ईशाच्या चमकदार केसांचं रहस्य असलेला हेअर मास्क तयार करण्यासाठी आपल्याला ऑलिव्ह ऑईल, नारळ तेल, लेव्हेंडर तेल आणि अंडी आवश्यक असतील. हेअर मास्क बनवण्याच्या साहित्याचा फोटो तिने इन्स्टाग्रामवरही शेअर केला आहे. ज्यामध्ये या सर्व गोष्टी दिसतात.
अंड्यात भरपूर जीवनसत्त्वे असतात, जे आपल्या केसांना गळती होण्यापासून रोखतात. आपल्या केसांना मॉइस्चराइझ करण्यात अंड्याचा द्रव भाग खूप फायदेशीर असतो. यात व्हिटामिन ए, व्हिटामिन ई आणि बायोटिन असते, जे आपल्या केसांच्या वाढीस अतिशय उपयुक्त ठरते (Esha Gupta Shares Hair Mask Recipe).
नारळ तेल आपल्या केसांना मुळापासून मॉइश्चराइझ करते. यातील प्रथिने आपल्या केस गळतीच्या समस्येस प्रतिबंध करतात आणि केस मजबूत करण्यात खूप प्रभावी ठरतात. नारळ तेल आपल्या केसांच्या वाढीसही खूप उपयुक्त आहे.
ऑलिव्ह ऑईल आपल्या केसांना चमकदारपणा व कोमलता आणण्यास मदत करते. कोरडे केस असलेल्यांसाठी हे तेल विशेषतः अधिक उपयुक्त आहे. ऑलिव्ह तेल आपल्या केसांना कंडिशनिंग करण्यास देखील मदत करते.
अभ्यास मते, लेव्हेंडर तेल आपल्या केस वाढीसाठी उपयुक्त आहे. हे तेल आपली केस गळतीची समस्या कमी करते.
(टीप : सौंदर्य तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
(Esha Gupta Shares Hair Mask Recipe)
Skin care | ईशा गुप्ताने शेअर केली फेस मास्क तयार करण्याची रेसिपी…https://t.co/TCryvE6rzI #EshaGupta | #Bollywood | #facemask |
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 31, 2021