मुंबई : आज जवळजवळ प्रत्येक माणूस मधुमेह या आजाराशी परिचित आहेत. जर आहारात साखर अधिक प्रमाणात वापरली गेली, तर त्यामुळे आपल्या शरीरातील प्रणालीच्या कार्यात बिघाड होऊ शकते आणि त्या बरोबरच उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकाराच्या समस्या यासारख्या अनेक गंभीर आजारांची लागण होऊ शकते. म्हणूनच, तुम्हालाही तुमची जीवनशैली सुधारण्याची गरज आहे (Excess Sugar in food can harm your body).
आपण आहारात जास्त साखर वापरल्यास आपल्या शरीरावर त्याचे नकारात्मक परिणाम दिसून येतात. परंतु, साखर वर्ज्य करणे फार सोपे नाही. आपल्या निरोगी जीवनशैलीच्या मार्गात येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी स्वतःला मानसिकदृष्ट्या बळकट करावे लागेल. जर आपल्याला साखर डीटॉक्स कशी करावी, हे जाणून घ्यायचे असेल, तर आम्ही येथे त्यासाठी काही उपाय सांगणार आहोत, ज्याद्वारे आपण आहारातील साखर कमी करू शकता.
साखर आपल्या अन्नामध्ये मोजली जाते, ज्याचा आपल्या मेंदूवर औषधासारखा प्रभाव होतो. म्हणून, आपल्या शरीरातून साखर पूर्णपणे काढून टाकल्यास, त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. असे म्हटले जाते की, व्यसनाधीन पदार्थांचा मेंदूच्या रिवॉर्ड प्रणालीवर परिणाम होतो आणि म्हणूनच कधीकधी उलट परिणाम दिसून येतो. यावरून हे स्पष्ट झाले आहे की, आपण एकाच वेळी आपल्या शरीरातून आणि आहारातून साखर पूर्णपणे काढू शकत नाही. ही एक मोठी प्रक्रिया आहे, ज्यामध्ये आपल्याला दररोज साखरची मात्रा कमी-कमी करण्याची आवश्यकता असेल.
जेव्हा आपण डीटॉक्सच्या कठीण आव्हानांना तोंड देण्यासाठी स्वतःला तयार करता तेव्हा सर्व प्रथम, आपल्याला हळूहळू काही पर्यायांसह साखर पुनर्स्थित अर्थात पर्यायी बदल करावे लागतील. हे आपल्या मेंदूला आवश्यक असणाऱ्या साखरेची कमतरता भरून काढेल. आपल्याला साखर वर्ज्य काही क्लृप्त्या अनुसरण करणे आवश्यक आहे (Excess Sugar in food can harm your body).
पाणी कोणत्याही प्रकारचे पदार्थ विरघवळण्यास सक्षम आहे आणि हे शरीरातील अपशिष्ट सामग्री काढून टाकण्याचे देखील कार्य करते. तसेच, जर आपल्याला तहान लागली असेल तर पाणी प्यावे, यामुळे अतिरिक्त साखरयुक्त सोडा पेय पिण्याची गरज वाटत नाही. शरीर हायड्रेटेड राहिल्यास आरोग्याच्या इतर समस्यांशी लढायला मदत होईल.
आपण आपल्या दिवसाची सुरुवात साखरयुक्त पदार्थ खाऊन करू नये, हे तुमच्या आरोग्यासाठी अधिक चांगले होईल. त्याऐवजी, आपला दिवस फळ किंवा प्रथिनांनी समृद्ध ऑमलेटसह सुरु करा.
साखरेपासून दूर राहणे आणि सर्व पौष्टिक व सूक्ष्म पोषक घटकांसह संतुलित आहाराचे सेवन करणे नेहमीच चांगले. यासाठी आहारात फळे आणि भाज्या खा, जे तुम्हाला यामध्ये मदत करतील आणि गोड खाण्याने होणाऱ्या हानीपासून तुमचे रक्षण करतील. आपल्यासाठी भरपूर प्रमाणात प्रोटीन खाणे देखील खूप महत्वाचे आहे. त्या बदल्यात, हे आपल्या शरीराच्या ऊतींना पोषण देईल आणि आपले आरोग्य सुधारेल. नैसर्गिक साखर आपल्यासाठी हानिकारक नाही, परंतु आपल्याला आपल्या आहारात सामील होणाऱ्या साखरेवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
(Excess Sugar in food can harm your body)
Diabetes Test | मधुमेहाची तपासणी करताना करू नका ‘या’ चुका, अन्यथा होईल मोठी गडबड!#DiabetesTest | #BloodSugar | #Health | #healthtips https://t.co/owd9wluP2X
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 12, 2021