Facial Exercise | चेहऱ्यावरील अतिरिक्त चरबी कमी करायचीय? मग ट्राय करा ‘हे’ सोपे व्यायाम

| Updated on: Feb 09, 2021 | 3:29 PM

शरीरावरील अतिरिक्त चरबी लपवणे किंवा कमी करणे सोपे आहे. परंतु, चेहऱ्यावरील चरबी कमी करणे ही अतिशय कठीण गोष्ट आहे.

Facial Exercise | चेहऱ्यावरील अतिरिक्त चरबी कमी करायचीय? मग ट्राय करा ‘हे’ सोपे व्यायाम
चेहऱ्याचे व्यायाम'
Follow us on

मुंबई : खराब जीवनशैली आणि खाण्याच्या बदलत्या सवयीमुळे बरेच लोक लठ्ठपणाच्या समस्येला सामोरे जात आहेत. अशा वेळी, शरीरावरील अतिरिक्त चरबी लपवणे किंवा कमी करणे सोपे आहे. परंतु, चेहऱ्यावरील चरबी कमी करणे ही अतिशय कठीण गोष्ट आहे. चेहऱ्याच्या ‘डबल चीन’ समस्येमुळे अनेकदा लोकांचा आत्मविश्वास देखील कमी होतो. चेहऱ्याच्या ‘डबल चीन’ समस्येची अनेक कारणे असू शकतात (Facial Exercise for double chin problem).

डबल चीनच्या समस्येमुळे आपणही त्रस्त असाल, तर आम्ही तुम्हाला चेहऱ्याचे काही व्यायाम प्रकार सांगणार आहोत ज्यामुळे तुमची ही समस्या कमी होईल. तसेच हा व्यायाम केल्याने त्वचेतील रक्त परिसंचरण वाढेल आणि सुरकुत्या कमी होतील. चला तर, चेहऱ्याच्या या व्यायाम प्रकारांबद्दल जाणून घेऊया…

हसणे

हसणे हा एक चांगला व्यायाम आहे. असे केल्याने, आपली जॉलाइन उठावदार होते आणि त्याच वेळी आपण सकारात्मक आणि आनंदी दिसू लागता. हा व्यायाम करत असताना हे लक्षात ठेवा की, आपण शक्य तितके आपले हसणे खेचण्याचा प्रयत्न करा. यामुळे त्वचा ताणली जाईल. हा व्यायाम दररोज 8 ते 10 वेळा केला पाहिजे.

फेस लिफ्ट व्यायाम

या व्यायामासाठी, आपल्या वरच्या ओठाचा काही भाग थोडा उंच करा आणि आपले गाल आपल्या बोटाच्या, तळहाताच्या सहय्याने वर उचला. डबल चीन कमी करण्यासाठी, दररोज 10 वेळा हा व्यायाम करा (Facial Exercise for double chin problem).

च्युईंग गम चघळा

च्युईंग गम चेहर्‍याची अतिरिक्त चरबी कमी करते आणि आपले स्नायू टोन्ड दिसतात. यामुळे आपली जॉलाईन आणखी तीव्र बनेल. हा व्यायाम केल्यास, आपल्या हनुवटीचे स्नायू कमी होतात.

भुवया (आयब्रो) व्यायाम

कपाळावरील अतिरिक्त कमी करण्यासाठी आपल्या बोटांची मदत घ्या. आपण आपल्या बोटांच्या मदतीने, भुवयांच्या शेवटी हलक्या हाताने दाबा आणि थोडे प्रेशर द्या. याशिवाय आपण भुवया वर आणि खाली हलवून व्यायाम. हा व्यायाम किमान 10 वेळा करा. याने आपल्या त्वचेमध्ये लवकरच फरक जाणवेल.

तोंडाचा व्यायाम

या व्यायामप्रकारासाठी आपल्याला आपले तोंड फक्त माशासारखे करावे लागेल. यासाठी आपण आपल्या तोंडाचा चौरस तयार करा. याच स्थितीत, आपल्याला डावीकडून उजवीकडे व उजवीकडून डावीकडे आपले तोंड वळवायचे आहे. हा व्यायाम दिवसातून किमान 7 ते 10 दहा वेळा करावा.

(Facial Exercise for double chin problem)

हेही वाचा :