Marathi News Lifestyle Facing damage hair after use of heating hair tools then try these diy remedies at home
तुमचे हेअर हीटिंग टूल्समुळे केस झाले खराब…मग परत सुंदर, चमकदार केसांसाठी करा ‘हे’ घरगुती उपाय…
सध्या सुंदर दिसण्यासाठी आपण केसांच्या (Hair) वेगवेगळ्या हेअरस्टाईल करतो. त्यासाठी लागणारे उपकर (Equipment) प्रत्येक महिला आणि तरुणींकडे असतात. कर्लर्स, हेअर ड्रायर आणि स्ट्रेटनर असे उपकरणे आज सहज दिसतात. या उपकराचा आपण वरच्यावर वापर केल्यास तर आपले केस खराब होतात. केस हे कालांतराने निर्जीव होतात. यातून आपल्याला केसांच्या अनेक समस्या जाणवतात.
प्रातिनिधिक फोटो
Image Credit source: google
Follow us on
सध्या सुंदर दिसण्यासाठी आपण केसांच्या (Hair) वेगवेगळ्या हेअरस्टाईल करतो. त्यासाठी लागणारे उपकर (Equipment) प्रत्येक महिला आणि तरुणींकडे असतात. कर्लर्स, हेअर ड्रायर आणि स्ट्रेटनर असे उपकरणे आज सहज दिसतात. या उपकराचा आपण वरच्यावर वापर केल्यास तर आपले केस खराब होतात. केस हे कालांतराने निर्जीव होतात. यातून आपल्याला केसांच्या अनेक समस्या जाणवतात. केस गळणे, केस कोरडे होणे, केसांची वाढ थांबणे, केस तुटणे अशा समस्या दिवसेंदिवस वाढलेल्या दिसून येत आहे. हीटिंग टूल्समुळे केसांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. नॅचरल (Natural) आणि घरगुती उपाय करुनही तुम्ही परत सुंदर आणि चमकदार केस मिळवू शकता. जशी आपण आपल्या चेहऱ्याची काळजी घेतो तशीच आपल्या केसांची पण काळजी घेणे गरजेचं आहे. केसांची योग्य काळजी घेतली की केसांचं आरोग्य चांगलं राहतं. आम्ही तुम्हाला खराब केसांना सुंदर बनविण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत.
एव्होकॅडो – हे केसांची निगा राखण्यासाठी सर्वोत्तम फळ आहे. त्यात असलेले फॅटी अँसिडस् आणि जीवनसत्त्वे केसांसाठी खूप फायदेशीर आहे. एका भांड्यामध्ये एवोकॅडो मॅश करा. मग त्यात अंड मिक्स करा. आणि ते एकजीव करा. आता हा हेअर मास्क केसांना लावून ठेवा. आणि अर्धा तासांनी हा हेअर मास्क थंड पाण्याने धुवा. हा घरगुती हेअर मास्क तुमचे खराब झालेले केस पुन्हा सुंदर करणार.
एप्पल सायडर व्हिनेगर – हे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. तसंच ते केसांसाठीही उपयुक्त आहे. यात असलेले जीवनसत्त्वे आणि खजिने हे केसांच्या आरोग्यासाठी चांगले आहे. हा हेअर मास्क तयार करण्यासाठी एक एका भांड्यात दोन चमचे व्हिनेगर, एक चमचा ऑलिव्ह ऑईल आणि एक अंडे घ्या. हे मिश्रण चांगले मिक्स करा. आता हा हेअर मास्क अर्धा तासासाठी टाळूला लावून ठेवा. अर्धा तासांनंतर हलक्या हाताने मसाज करा आणि नंतर केस धुवा.
कोरफड जेल – सौंदर्यसाठी कोरफड जेल हे खूप फायदेशीर आहे. यात असलेले अनेक अँटीबॅक्टेरियल तुमच्या केस आणि स्कॅल्प निरोगी ठेवण्यास मदत करते. कोरफड जेलमुळे हे केसांसाठी उत्तम कंडिशनर आहे. या हेअर मास्कसाठी एका वाटीत खोबरेल तेल घ्या. त्यात तीन चमचे कोरफड जेल मिक्स करा.आता या मिश्रणाने टाळूला मसाज करा. आणि केसांच्या मुळापर्यंत चांगले लावा. साधारण एक दीडतासाने केस धुवून टाका.
दही – दही हे केसांची निगा राखण्यासाठी सर्वात फायदेशीर आहे. हे केसांसाठी एक नैसर्गिक कंडीशनर आहे. आणि दही हे प्रत्येक घरात असतं. आठवड्यातून दोन वेळा केसांना दही लावा. आणि अर्धा तासानंतर केस पाण्याने स्वच्छ धुवा. हा उपाय नियमित केला तर तुम्हाला नक्की याचा फायदा होईल.
या बातमीतील आरोग्यविषयक सल्ला प्राथमिक माहितीच्या आधारावर आहे, या माहितीचा वापर करण्यापूर्वी आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्यावा.