मुंबई : हवामान बदलले (Weather Changed) की, त्याचा परिणाम नेहमी आपल्या त्वचेवर जाणवत असतो. या शिवाय चुकीच्या खानपान पध्दतीने, कृत्रिम बाहेरील प्रोडक्ट, शरीरातील हार्मोन्स आदींचा परिणाम आपल्या शरीरावर व खासकरुन आपल्या त्वचेवर दिसून येतो. अशा वेळी अंगाला तीव्र खाज सुटते, लाल रंगाचे चट्टे पडणे, वळखण दिसणे, त्वचेची आग होणे हे (Skin Allergy) अॅलर्जीचे सामान्य लक्षणे दिसून येत असतात. कधीकधी लाल पुरळ येण्यामागे चुकीचे तेल किंवा क्रीम वापरणे देखील कारण असू शकते. यापासून मुक्त होण्यासाठी, डॉक्टरांच्या सल्ल्याने घरगुती उपायदेखील (Home Remedies) चाचपडून पाहता येतात. अनेकदा त्वचेशी संबंधित समस्यांबाबत आपण कृत्रिम उपाय योजना करीत असतो. परंतु यातून काहीच साध्य होत नाही. पारंपारिक आयुर्वेदीक उपचार पध्दतींमध्ये त्वचेच्या समस्यांबाबत अनेक घरगुती उपाय योजना सांगितल्या आहेत. त्याच्या वापरातूनही आपण या समस्यांना मुळापासून नष्ट करु शकतो.
वातावरणातील बदल, प्रदूषण किंवा चुकीचा आहार, पालेभाज्या, फळे, सुकामेवा, संपूर्ण धान्य आदींची कमतरता यामुळे त्वचेला खाज येण्याबरोबरच काही वेळा अॅलर्जीचाही सामना करावा लागतो. हवामानातील थोडासा बदल किंवा धूळ आणि मातीचा परिणाम लगेच त्वचेवर व केसांवर दिसून येत असतो. हवामान थंड असो किंवा गरम, पहिला परिणाम त्वचेवरच दिसून येतो. या लाल पुरळांमुळे अनेकदा त्वचेवर खाज सुटणे आणि जळजळ होऊ लागते.
खोबरेल तेल हे त्वचेसाठी अत्यंत प्रभावी आहे. त्वचेला ‘हायड्रेड’ ठेवण्यासाठी खोबरेल तेल गुणकारी ठरते. यामध्ये असलेल्या अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मामुळे त्वचेवरील अॅलर्जी दूर करण्याची क्षमता असते. तेलामुळे त्वचेला आवश्यक ते सर्व पोषक घटक मिळत असतात. डॉक्टर देखील त्याचा वापर करण्याची शिफारस करतात. त्वचेवर लाल पुरळ उठण्याची समस्या असेल तिथे खोबरेल तेल प्रभावी ठरु शकते. लाल पुरळ असलेल्या भागाला हलक्या हाताने मसाज करा आणि नंतर कोमट पाण्याने स्वच्छ करा.
कोरफड हे त्वचा, केस आदींसाठी गुणकारी मानले जाते, अनेक जण कोरफडीचा रस पितात, यातून पोटासंबंधित सर्व आजार नाहिसे होतात. कोरफड त्वचेशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी प्रभावी मानले जाते. त्वचेला खाज सुटणे आणि अॅलर्जी व्यतिरिक्त, कोरफडमुळे त्वचा चमकदार आणि हायड्रेटेड ठेवण्यासाठी मदत मिळत असते. तुम्ही फक्त कोरफडीची जेल मॅश करा आणि प्रभावित भागावर लावा आणि काही मिनिटांनंतर ते साध्या पाण्याने काढून टाका. असे केल्याने अॅलर्जी बर्याच प्रमाणात दूर होऊ शकते.
तुळशीच्या औषधी गुणधर्मामुळे त्वचाच नाही तर पोटही निरोगी ठेवता येते. त्वचेसाठी त्याची पाने बारीक करून पेस्ट बनवा आणि त्यात मध घाला. तुळशीच्या पानांची पेस्टही त्वचेवर लावू शकता. त्वचेवरील लालसरपणा, खाज सुटणे आणि जळजळ होणे या समस्या तत्काळ दूर झालेल्या दिसतील.
Skin Care : डी-टॅन पॅक घरी बनवायचा आहे का? मग ही खास पध्दती फाॅलो करा आणि तजेलदार त्वचा मिळवा!
अॅपल सायडर व्हिनेगरमुळे कोंड्याची समस्या झटपट दूर होईल! तुम्हाला माहीत आहे कसे?