मुंबई : आपण आजी आणि आजीच्या घरगुती उपचारांबद्दल बरेच ऐकले असेल. आजार छोटा असो किंवा मोठा असो आजारामध्ये काही वेळा घरगुती उपचार रामबाण औषध असल्याचे सिद्ध झाले आहे. अनियमित जीवनशैली आणि अनियमित खाण्यामुळे ओटीपोटात वेदना, अॅसिडिटी, शुगर सारख्या समस्या सामान्य आहेत. घरगुती उपचारांच्या माहितीमुळे आपल्याला पुन्हा पुन्हा डॉक्टरकडे जाण्याची गरज लागत नाही. अगदी स्वयंपाकघरातील एखादी लहान गोष्ट देखील आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते आणि तुम्हाला अॅलोपॅथीच्या औषधांपासून दूर ठेवते. (Fenugreek benefacial for diabetes, acidity, weight loss, know all benefits)
आपण मेथीच्या दाण्यांबद्दल बोलत आहोत, ज्याचा उपयोग आपल्या स्वयंपाकघरात मसाले म्हणून वापरली जातात. मेथीच्या दाण्यामुळे आपल्या अन्नाची चवच वाढत नाही तर ती आपल्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. सकाळी मेथीचे दाणे खाल्ल्यास तुम्ही बर्याच आजारांना टाळू शकता.
– एक चमचा मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजवा. नंतर सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन करा.
– याचे पाणी प्या आणि मेथीचे दाणेही चाऊन खा. असे केल्याने वजन कमी करण्यात आपल्याला खूप मदत होईल.
– अॅसिडिटीच्या समस्येवर मेथीचे दाणे देखील एक अतिशय प्रभावी उपाय आहे. मेथीच्या दाण्यांचा उपयोग हाजमा चुरणातही केला जातो.
– आपल्याला कधीही अॅसिडिटीची समस्या असल्यास मेथीची दाणे खाणे फायद्याचे आहे.
– आजकाल बरेच लोक मधुमेह किंवा शुगरच्या समस्येने त्रस्त आहेत. शुगर लेवल नियंत्रण ठेवणे त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचे असते.
– अशा रुग्णांनी दररोज मेथीचे सेवन करावे. असे केल्याने त्यांची साखरेची पातळी नियंत्रित होण्यास मदत होते.
– केस गळतीच्या समस्येमुळे देखील बरेच लोक त्रस्त आहेत. या समस्येमध्ये मेथीचे दाणेही खूप उपयुक्त आहेत.
– ते पाण्यात भिजवून ठेवा आणि नंतर ते बारीक वाटून केसांच्या मुळांना लावा. मेथीचे दाणे केसांना सुंदर, जाड आणि मऊ करतात.
– आपल्या शरीरात कोलेस्टेरॉलची समस्या असल्यास आपण आजपासूनच मेथीचे दाणे घ्यावेत. कोलेस्टेरॉल कमी करण्यातही मेथीचे दाणे खूप फायदेशीर असतात. (Fenugreek benefacial for diabetes, acidity, weight loss, know all benefits)
Virat Kohli | शानदार, जबरदस्त ! इंग्लंडवर 7 धावांनी विजय, कर्णधार विराटचं अनोखं ‘द्विशतक’, मानाच्या पंक्तीत स्थानhttps://t.co/pgt2yUoDfV#indvseng #INDvsENG #indvsEng3rdODI #ViratKohli
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 28, 2021
इतर बातम्या
राधिका आपटेने शेअर केला ‘Mrs. undercover’चं पोस्टर, नवरीच्या कमरेला चक्क रिव्हॉल्वर!
व्होडाफोन, आयडिया युजर्ससाठी आनंदाची बातमी, आता या 23 रिचार्ज पॅकवर मिळवा 60 रुपयांपर्यंत कॅशबॅक