अंजीर की खजूर? दुधात काय मिसळून पिणं फायद्याचं? तज्ज्ञ काय म्हणतात?

| Updated on: Oct 28, 2024 | 12:50 PM

हिवाळ्यात आरोग्य उत्तम राखण्यासाठी अंजीर आणि खजूर दूधासोबत सेवन करणे फायदेशीर आहे. दोन्ही ड्रायफ्रुट्स पोषणयुक्त असून, अंजीर पचनसंस्थेसाठी तर खजूर ऊर्जेसाठी उत्तम आहेत. दूधासोबत सेवन केल्याने हाडांना आणि त्वचेलाही फायदा मिळतो.

अंजीर की खजूर? दुधात काय मिसळून पिणं फायद्याचं? तज्ज्ञ काय म्हणतात?
Follow us on

हिवाळा सुरू होणार आहे. हिवाळ्यात अनेक लोक त्वचेची प्रचंड काळजी घेतात. स्वत:ची काळजी घेतात. हिवाळ्यात बहुतेक लोक ड्रायफ्रूट्स खातात. ड्रायफ्रूट खाणं आरोग्यासाठी अत्यंत चांगलं असतं. हे आरोग्यासाठी अत्यंत चांगलं असतं. सुकामेवा शरीराला गरम ठेवतो. ड्रायफ्रूट्स, अँटी ऑक्सिडंट, प्रोटिन, व्हिटॅमिन आणि फॅटसारखे पोषक तत्त्वांचे पॉवर हाऊस आहेत. सुकामेवा शरीरारचं पोषण करतोच पण सोबतच शरीराला एनर्जीचा पुरवठाही करतो.

दिल्लीच्या धर्मशिला नारायणा हॉस्पिटलच्या चीफ डायटेशियन पायल शर्मा यांनी याबाबतची माहिती दिली. काही लोक दुधासोबत ड्रायफ्रूट्स खाणं पसंत करतात. बहुतेक लोक अंजीर आणि खजूर दुधात टाकून खातात. तर अनेक लोकांना अंजीर दुधात मिसळून खावं की खजूर दुधात टाकून खावं हे कळत नाही. त्यांचा नेहमी गोंधळ असतो, असं पायल शर्मा यांनी सांगितलं. त्यामुळे अंजीर दुधात टाकून खाणं चांगलं की खजूर यावर टाकलेला हा प्रकाश.

दोन्ही हेल्दी पर्याय

अंजीर आणि खजूर दोन्हीही आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. अंजीर आणि खजूर दुधात मिसळून खालल्ले तर त्याचा अधिक फायदा होतो. अंजीरमध्ये भरपूर फायबर असते. त्यामुळे पचनतंत्र चांगलं राहतं. यातील अँटिऑक्सिडंट्समुळे शरीराला ऊर्जा मिळते. इम्युनिटी मजबूत होते. दुसरीकडे खजूरमध्ये नॅचरल शुगर असते. त्यामुळे ऊर्जा मिळते. ताजंतवाणं वाटतं.

हाडे आणि त्वचेसाठी

तुम्ही दुधात जेव्हा खजूर किंवा अंजीर मिसळून पिता तेव्हा एक पौष्टीक ड्रिंक तयार होतं. हाडांसाठी हे ड्रिंक अत्यंत चांगलं असतं. दुधात कॅल्शियम आणि अंजीरमध्ये मॅग्नेशियम अधिक असतं. ते स्कीनसाठीही अत्यंत चांगलं आहे. दुधात अंजीर टाकून प्यायल्यास त्वचा उजळलते.

थकवा दूर होतो

दुधात अंजीर किंवा खजूर टाकून प्यायल्यास थकवा दूर होतो. तुम्ही दिवसभर ऊर्जावान राहता. तुम्ही जर वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर दुधात अंजीर किंवा खजूर टाकून प्या. त्यामुळे पोट भरल्यासारखं वाटेल. त्यामुळे अधिकाधिक खाण्यापासून तुम्ही दूर राहाल. अंजीर आणि खजूरसोबत दूध घेणं खूपच चांगलं मानलं जातं. त्यामुळे आरोग्य चांगलं राहतं