मुंबई : बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांचे छोटे भाऊ अभिनेते राजीव कपूर यांचे वयाच्या 58व्या वर्षी मंगळवारी निधन झाले. ऋषी कपूर यांच्या निधनाच्या एक वर्षानंतर राजीव यांचे असे अचानक निघून जाणे, हा त्यांच्या कुटुंबासाठी मोठा धक्का आहे. मिळालेल्या माहितीनुसार राजीव यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांची तब्येत ढासळताच कुटुंबियांनी त्यांना रूग्णालयात दाखल झाले, परंतु तरीही त्यांचा जीव वाचू शकला नाही (First aid treatment for saving life during heart attack).
एका संशोधनादरम्यानच्या सर्व आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, भारतात हृदयविकाराच्या झटक्यांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे, यात तरुण मंडळींचाही समावेश आहे. वास्तविक, बऱ्याच लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याची सुरुवातीची लक्षणे समजत नाहीत आणि रूग्णालयात नेईपर्यंत जीव वाचवण्याइतके प्राथमिक उपचार त्यांना मिळत नाहीत. यामुळे, बर्याच वेळा रुग्णालयात पोहोचेपर्यंत रुग्णाची प्रकृती गंभीर बनते आणि कधीकधी मृत्यू देखील होऊ शकतो. आपल्या कुटूंबाला कोणत्याही प्रकारच्या अनुचित घटनेपासून वाचवण्यासाठी हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे आणि प्रथमोपचार संबंधित आवश्यक माहिती जाणून घेतलीच पाहिजे..
छातीत जडपणा किंवा तीव्र वेदना, छातीत दुखणे, हात, जबडा, मान, पाठ आणि ओटीपोटात दुखणे, घाम येणे, चक्कर येणे किंवा चिंताग्रस्त होणे, श्वास लागणे, मळमळणे आणि खोकला येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, अशक्तपणा वाटणे इत्यादी लक्षणे दिसू शकतात. मात्र कधीकधी वेदना खूपच जोरात होतात, तर कधीकधी सौम्य असतात किंवा जाणवतच नाहीत. परंतु, इतर लक्षणांसह आपण त्याचा आधीच अंदाज लावू शकता (First aid treatment for saving life during heart attack).
– जर सदर व्यक्ती शुद्धीत असेल, तर ताबडतोब त्यांना 300 मिलीग्राम एस्पिरिन द्या. हे रक्त पातळ करण्यासाठी महत्त्वाचे आहे. कधीकधी रक्ताची गुठळ्या होणे हे हृदयविकाराच्या झटक्याचे कारण बनू शकते. जर असे काही झाले, तर त्याला आराम मिळेल. परंतु यासह, रुग्णाला ताबडतोब रुग्णालयात घेऊन जा.
– जर रुग्ण बेशुद्ध पडला असेल तर ताबडतोब त्याला सपाट ठिकाणी झोपवा. नंतर त्याच्या नाकाजवळ बोटांनी किंवा कानांनी त्याचा श्वास तपासा. शिवाय नाडी देखील तपासा.
– श्वास किंवा नाडी येत नसेल तर ताबडतोब सीपीआर द्या. यासाठी आपला डावा हात सरळ ठेवा आणि उजवा हात त्याच्या वर ठेवा आणि बोटांनी लॉक करा. यानंतर, आपले हात रुग्णाच्या छातीच्या मध्यभागी आणा आणि आपल्या सर्व ताकदीनिशी रुग्णाची छाती दाबा.
– लक्षात ठेवा की, आपल्याला दर मिनिटाला 100 कॉम्प्रेशन्स द्याव्या लागतील, ही क्रिया रुग्ण शुद्धीवर येईपर्यंत किंवा रुग्णवाहिका येईपर्यंत करवी लागेल.
– रुग्णाची छाती दाबा आणि प्रत्येक 25-30 वेळा रुग्णाला तोंडाद्वारे ऑक्सिजन द्या. तोंडाद्वारे ऑक्सिजन देताना त्या व्यक्तीचे नाक बंद करा.
– कॉम्प्रेशन दरम्यान, रुग्णाच्या छातीच्या हाडात किंवा बरगड्यांमध्ये कोणतीही समस्या नसल्याची खात्री करून घ्या, कारण रुग्णाचे आयुष्य वाचवणे याला प्रथम प्राधान्य आहे. उर्वरित समस्या रुग्णालयात देखील हाताळल्या जाऊ शकतात.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
(First aid treatment for saving life during heart attack)
Facial Exercise | चेहऱ्यावरील अतिरिक्त चरबी कमी करायचीय? मग ट्राय करा ‘हे’ सोपे व्यायाम#FacialExercise | #beauty | #beautytips https://t.co/GuLLVxDXHw
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 9, 2021