थंडीच्या दिवसात दिवसभर आळस येतो, तर सकाळी उठल्यावर करा ‘हे’ काम

| Updated on: Jan 03, 2025 | 6:32 PM

हिवाळ्यात सकाळी उठल्या उठल्या अंगात आळस भरणे हि खूप सामान्य आहे, पण जर तुम्हला दिवसभर आळस येत असेल तर ते तुमच्या आरोग्यासाठी आणि वैयक्तिक आयुष्यासाठी योग्य नाही, त्यामुळे हिवाळ्यात दिवसभर स्वतःला ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी तुम्ही या टिप्स फॉलो करू शकता.

थंडीच्या दिवसात दिवसभर आळस येतो, तर सकाळी उठल्यावर करा हे काम
Follow us on

थंडीच्या दिवसांमध्ये वातावरण थंड असल्याने अनेकांना झोपेतून उठू वाटत नाही. तसेच या दिवसांमध्ये अनेकजण खूप आळशी बनतात. पण एक किंवा दोन दिवस आळस येत असेल तर सामान्य आहे परंतु, जर तुम्हाला दररोज थकवा जाणवणे आणि आळस येत असेल तर त्याचा परिणाम तुमच्या दिनचर्या आणि आरोग्यावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आळस मागे टाकून आपल्या कामावर आणि आरोग्यावर लक्ष देणं खूप गरजेचं आहे. हिवाळ्यात आळशीपणापासून दूर राहण्यासाठी आणि दिवसभर ॲक्टिव्ह राहण्यासाठी तुम्ही या टिप्स फॉलो करू शकता.

सकाळी लवकर उठा

थंडीच्या दिवसात वातावरण कसेही असले तर लवकर उठण्याची सवय लावा, जसे की सकाळी ६ वाजता उठल्यास तुम्हाला निरोगी राहण्यास आणि मन ताजेतवाने ठेवण्यास मदत करू शकते.

हे सुद्धा वाचा

मेडिटेशन करा

आजकाल प्रत्येक व्यक्तीला ऑफिस किंवा इतर कामाचा ताण येत असतो. त्यामुळे प्रत्येकजण कामाचा ताण कमी करण्यासाठी रोज सकाळी काही वेळ मेडिटेशनही कर असतात. कारण शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी मेडिटेशन खूप फायदेशीर आहे, असे केल्याने रागावर नियंत्रण ठेवण्यास आणि मूड सुधारण्यास मदत होते.

व्यायाम करा

थंडीच्या दिवसात सकाळी उठून व्यायाम करणे जरा अवघड होते. तरी सुद्धा तुम्ही प्रयत्न करून रोज सकाळी उठून व्यायाम करण्याची सवय लावा. थंडीच्या दिवसात तुम्ही हलका व्यायाम करणे जसे की, स्ट्रेचिंग, योग, चालणे, असे प्रकार केल्याने तुमच्या शरीराला सक्रिय आणि ऊर्जावान राहण्यास मदत करते.

सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात वेळ घालवा

हिवाळ्यात सूर्यप्रकाश खूप महत्वाचा असतो, कारण सूर्यप्रकाशामुळे शरीरात व्हिटॅमिन डी तयार होते, जे हाडे आणि मानसिक आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे.त्यामुळे सूर्योदयानंतर 7 ते 8 च्या दरम्यान तुम्ही बाहेर जाऊन हलक्या सूर्यप्रकाशात बसू शकता, यामुळे शरीराला व्हिटॅमिन डी देखील मिळेल, तसेच शरीरात ताजेपणा निर्माण होण्यास आणि आळस दूर करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

कोमट पाणी प्या

हिवाळ्यात सकाळी कोमट पाणी पिऊ शकता. यामुळे चयापचयही वेगवान होते. सकाळी गरम पाणी प्यायल्याने शरीरातील साठलेले विषारी पदार्थ बाहेर पडण्यास आणि पोट साफ होण्यास मदत होते.