वातावरणातील प्रदुषणामुळे त्वचेबरोबर केसांवर सुद्धा परिणाम होत आहेत. यामुळे केस गळणे, केस फ्रिजी होणे या समस्या अनेकांना सतावत असतात. त्यातच तेलकट केसांच्या समस्येने अनेक लोकं त्रस्त झाले आहेत. सकाळी केस धुतले तरी संध्याकाळपर्यंत केस तेलकट दिसू लागतात. तसेच केस फ्रिजी आणि चिकट होतात. ही समस्या विशेषतः उष्ण आणि दमट हवामानात वाढते. तेलकट स्कॅल्पचे मुख्य कारण म्हणजे सेबमचे जास्त उत्पादन, जे टाळूला हायड्रेटेड आणि सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक आहे. पण जेव्हा ते जास्त प्रमाणात तयार होऊ लागते तेव्हा केस चिकट दिसू लागतात आणि धूळ आणि घाण त्यावर लवकर चिकटते, ज्यामुळे केस लवकर खराब होतात.
जर तुम्हालाही तेलकट केसांचा त्रास होत असेल, तर तुम्ही काही घरगुती उपाय करून पाहू शकता, जे पूर्णपणे नैसर्गिक आणि प्रभावी आहेत. तर मग जाणून घेऊया अशा प्रभावी उपायांबद्दल ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या केसांचा अतिरिक्त चिकटपणा कमी करू शकता.
अॅपल सायडर व्हिनेगर
केसांमधील तेलकटपणा कमी करण्यासाठी अॅपल सायडर व्हिनेगर हा एक चांगला पर्याय आहे. हे टाळूच्या पीएच पातळीला संतुलित करते आणि अतिरिक्त तेल उत्पादन नियंत्रित करण्यास मदत करते. यासाठी, एक कप पाण्यात २ चमचे अॅपल सायडर व्हिनेगर मिसळा. शॅम्पू केल्यानंतर, या मिश्रणाने तुमचे केस धुवा. काही मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर साध्या पाण्याने तुमचे केस परत धुवा. आठवड्यातून 2-3 वेळा हे करा.
लिंबाचा रस लावा
केसांमधील तेलकटपणा कमी करण्यासाठी तुम्ही लिंबाचा रस देखील वापरू शकता. कारण लिंबूमध्ये आम्लयुक्त गुणधर्म असतात, जे अतिरिक्त तेल काढून टाकण्यास मदत करतात आणि केसांना फ्रेश लूक देतात. तुम्हाला फक्त एक ग्लास पाण्यात 2 लिंबाचा रस मिक्स करायचा आहे. नंतर ते टाळूवर लावा आणि 10 मिनिटे तसेच राहू द्या आणि सौम्य शाम्पूने केस धुवा.
कोरफडीचे जेल देखील फायदेशीर आहे
कोरफडीचे जेल केसांमधील अतिरिक्त तेल काढून टाकण्यास देखील मदत करते. याशिवाय, ते टाळूला थंड करते, ज्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते. यासाठी 2 चमचे एलोवेरा जेल घ्या आणि त्यात थोडा लिंबाचा रस मिक्स करून ते टाळूवर लावा आणि 20 मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर शॅम्पूने केस धुवा.
मेथीचे पाणी वापरा
मेथी केसांसाठी खूप फायदेशीर मानली जाते. हे केसांच्या वाढीस तसेच त्यांना मजबूत करण्यासाठी प्रभावी आहे. तसेच केसांमधील अतिरिक्त तेल काढून टाकते. २ चमचे मेथीचे दाणे रात्रभर भिजत ठेवा. ते बारीक करा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी टाळूवर लावा. ३० मिनिटांनी केस धुवा.
मुलतानी माती हेअर पॅक
मुलतानी माती टाळूतील अतिरिक्त तेल शोषण्यास मदत करते, ज्यामुळे केस बराच काळ फ्रश राहतात. तुम्हाला फक्त 3 चमचे मुलतानी माती घेऊन त्यात थोडेसे पाणी मिसळून पेस्ट बनवायची आहे. तयार पेस्ट टाळू आणि केसांवर लावा आणि 20 मिनिटे तसेच राहू द्या. नंतर साध्या पाण्याने केस धुवा अशाने तूमची तेलकट केसांची समस्या दूर होतील.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)