नवी दिल्ली | 28 जुलै 2023 : स्वतःला सुरक्षित ठेवायचे असेल तर जीवनशैलीत सकारात्मक (changeinlifestyle) बदल करणे हा एकमेव मार्ग आहे. जेवणात आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करणे महत्वाचे ठरते. गेल्या काही काळापासून लोकांमध्ये मधुमेह, रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका वाढला आहे. खराब जीवनशैलीमुळे तरुणांमध्ये हृदयविकाराचा (Heart disease risk) धोकाही वाढला आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले. हृदयविकाराची संभाव्य कारणे तसेच त्याची सुरुवातीची लक्षणे काय ते जाणून घेऊया.
हृदयविकाराची लक्षणे काय ?
हे एक प्रकारचे छातीत दुखणे असते जे हृदयाला रक्त प्रवाह कमी झाल्यामुळे होते. स्थिर एनजाइनाच्या रुग्णाला व्यायामानंतर छातीत दुखते, परंतु हृदयविकाराचा झटका येताना आराम करताना वेदना होऊ लागतात. कधीकधी छातीत जडपणा आणि छातीवर दाब देखील जाणवतो.
श्वास घेण्यास त्रास होणे किंवा खूप जोरात श्वास घेणे हे हा आजार वाढल्याचे लक्षण आहे. विश्रांती घेत असताना देखील हे होऊ शकते.
हृदयाचे ठोके खूप वेगवान जाणवणे, मूर्च्छित किंवा बेशुद्ध होणे.
सहसा, श्वास सोडताना, डोक्यात किंचित जडपणा किंवा चक्कर आल्याची भावना जाणवते.
तज्ज्ञ काय सांगतात ?
30 मिनिटे वॉक घेताना तुम्हाला काही लक्षणे जाणवली नाहीत तर समजावे की तुमचे हृदय स्वस्थ आहे. यासाठी नियमितपणे चालायला जावे, यामुळे आजाराच्या सुरूवातीलाच त्याचे निदान होण्यास महत होते. जंक फूड आणि तळलेले पदार्थ न खाता हेल्दी डाएट घ्यावे. जंक फूडमुळे आरोग्य धोक्यात येते.
CDC रिपोर्टनुसार, कधीकधी हृदयविकार सायलेंटही असू शकतात, म्हणजेच ते पटकन लक्षात येत नाहीत. हाय ब्लड प्रेशर, हाय कोलेस्ट्रॉल आणि स्मोकिंग हे हृदयरोगासाठी कारणीभूत ठरू शकते.
काय खावे ?
आरोग्य तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, भाजीमध्ये जास्त मीठ वापरू नका आणि डबाबंद पदार्थ वापरणे टाळावे.
चालण्याचा व्यायाम
हृदयविकाराच्या रुग्णांसाठी चालणे हा सर्वोत्तम व्यायाम आहे. सुरुवातीला वेग कमी ठेवावा आणि हळूहळू तुमचा चालण्याचा वेग आणि वेळ दोन्ही वाढवावे. निरोगी व्यक्तीने किमान 30 मिनिटे चालावे अशी शिफारस अमेरिकन हार्ट असोसिएशनने केली आहे.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)