हिवाळ्यात मुलायम आणि चमकदार त्वचेसाठी चेहऱ्यावर रात्री ‘या’ गोष्टींनी मसाज करा….

| Updated on: Jan 03, 2025 | 3:50 PM

सुंदर आणि निस्तेज त्वचेसाठी योग्य काळजी घेणे गरजेचे असते. तुमच्या आहारामध्ये पोषक घटकांचा समावेश केल्यामुळे तुमची त्वचा चमकदार होण्यास मदत होते. हिवाळ्यामध्ये अनेकांची त्वचा कोरडी पडते आणि पिंपल्स सारख्या समस्या होतात. काही घरगुती उपाय केल्यामुळे तुमची त्वचा अधिक चमकदार आणि हायड्रेट होण्यास मदत होते. काही गोष्टींचा वापर केल्यामुळे तुमच्या पिंपल्सच्या समस्या दूर होण्यास मदत होते.

हिवाळ्यात मुलायम आणि चमकदार त्वचेसाठी चेहऱ्यावर रात्री या गोष्टींनी मसाज करा....
Follow us on

आपली त्वचा सुंदर आणि चमकदार दिसावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. परंतु, सुंदर त्वचेसाठी योग्य काळजी घेणे आवश्यक असते. तुम्हाला देखील पिंपल्स आणि मुरुम यांच्यासारख्या समस्येमुळे त्रस्त असाल तर यंदाच्या हिवाळ्यामध्ये तुमच्या त्वचेची योग्य पद्धतीनं काळजी घ्या. हिवाळ्यामघ्ये वातावरणातील आद्रता कमी होते ज्यामुळे तुमची त्वचा कोरडी पडू लागते. अनेकजण यंदाच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे जंक फूडचे जास्त प्रमाणात सेवन करतात. जंक फूड जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे तुमच्या शरीराला योग्य पोषण मिळत नाही. शरीराला योग्य पोषण न मिळाल्यामुळे तुमची त्वचा निस्तेज दिसू लागते.

तुम्हाला जर चमकदार आणि निस्तेज त्वचा हवी असेल तर तुमच्या आहारामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटिन, फायबर, अँटिऑक्सिडेंट्स, व्हिटॅमिन ए, सी आणि बी अत्यंत महत्त्वाचे घटक मानले जाते. तुमच्या आहारामध्ये फळांचे सेवन केल्यामुळे तुमची त्वचा चमकदार होण्यास मदत होते. फळांमध्ये अँटिऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात असतात ज्यामुळे तुमच्या पिंपल्सच्या समस्या दूर होतात. हिवाळ्यात तुमच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी काही घरगुती उपाय करणं गरजेचे आहे. चला तर जाणून घेऊया हिवाळ्यात तुमच्या त्वचेची काळजी कशी घ्यावी?

हिवाळ्यात रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या चेहऱ्यावर बदामाच्या तेलानी मसाज करा. बदामाच्या तेलानी चेहऱ्यावर मसाज केल्यामुळे तुमची त्वचा चमकदार होण्यास मदत होते. बदामाच्या तेलामुळे तुमच्या चेहऱ्यावरील कोरडेपणा दूर होण्यास मदत होते. बदामाच्या तेलामध्ये चेहऱ्याचा मसाज केल्यामुळे तुमची त्वचा नैसर्गिकरित्या मॉइश्चराईज होतो आणि अधिक चमकदार होते.

कोरफड जेल तुमच्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो. कोरफड जेलमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडेंट्स असतात. अँटिऑक्सिडेंट्समुळे तुमची त्वचा अधिक चमकदार आणि हायड्रेटेड होण्यास मदत होते. हिवाळ्यामध्ये अंघोळीनंतर तुमच्या चेहऱ्यावर कोरफड जेलने मसाज केल्यामुळे तुमची त्वचा मॉइश्चराईझ होतो आणि नैसर्गिकरित्या हायड्रेटेड होते. कोरफड जेलमुळे तुमची त्वचा उजळण्यास मदत करते. कोरफड जेलमुळे तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स आणि डाग कमी होण्यास मदत होते.

नारळाचे तेल आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असते. रात्री झोपण्यापूर्वी नारळाच्या तेलानी चेहऱ्यावर मसाज केल्यामुळे तुमची त्वचा हायड्रेटेड राहाण्यास मदत होते. नारळाच्या तेलामध्ये अँटिऑक्सडेंट्स असतात ज्यामुळे तुमची कोरडी त्वचा नैसर्गिक रित्या मऊ आणि चमकदार होते. खोबरेल तेलामध्ये भरपूर प्रमाणात फॅटी अॅसिड्स असतात ज्यामुळे तुमच्या त्वचेचं आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते.

हिवाळ्यामध्ये कोरड्या त्वचेवर कच्च्या दुधाने मसाज केल्यामुळे तुमची त्वचा मुलायम होण्यास मदत होते. रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर कच्च दुध लावल्यामुळे तुमच्या त्वचेला अनेक फायदे होतात. कच्च्या दुधाचा मसाज केल्यामुळे तुमच्या त्वचेवरील मृत त्वचा दूर होण्यास मदत होते. कच्च्या दुधामुळे तुमची त्वचा मुलायम होण्यास मदत होते. तुम्हाला जर चेहऱ्यावर काळ्या डागांची समस्या असेल तर तुम्ही कच्च्या दुधाचा वापर करावा.

तूप तुमच्या आरोग्यासह त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो. हिवाळ्यामध्ये तुमच्या चेहऱ्यावर तुपाने मसाज केल्यामुळे तुमची त्वचा अधिक हायड्रेटेड आणि चमकदार होण्यास मदत होते. तुपामुळे तुमची त्वचा अधिक मुलायम होते. तुम्हाला जर जास्त प्रमाणात सुरकुत्या आणि काळ्या रेषा असतील तर तुमच्या चेहऱ्यावर तुपाचा मसाज हलक्या हातानी करावा.