तुम्ही तुमचा चेहरा नीट धुता का ? या टिप्स फॉलो करून मिळवा चमकदार त्वचा

| Updated on: Dec 15, 2022 | 5:07 PM

चेहरा धुणं ही तुम्हाला एक सामान्य प्रक्रिया वाटत असेल पण हे एवढंही सोपं नाहीये. तुम्हाला निरोगी आणि चमकदार त्वचा हवी असेल तर या स्टेप्स फॉलो करा.

तुम्ही तुमचा चेहरा नीट धुता का ? या टिप्स फॉलो करून मिळवा चमकदार त्वचा
या स्टेप्स फॉलो करून मिळवा ग्लोईंद त्वचा
Image Credit source: Freepik
Follow us on

नवी दिल्ली – आपण सर्वजण दिवसभरात एक किंवा दोन वेळा आपला चेहरा धुतो. चेहरा धुण्याची (face wash) ही क्रिया ऐकताना खूप साधारण वाटत असली तरी ते तितकं सोप नाहीये. चेहरा धुण्यासाठी व्यवस्थित वेळ काढला पाहिजे आणि संपूर्णपणे लक्षही दिलं पाहिजे. योग्य पद्धतीने चेहरा धुतल्यास पिंपल्सपासून (pimples) मुक्ती मिळू शकते, तसेच स्वच्छ आणि चमकती त्वचाही (glowing skin) मिळेल. तुमच्या त्वचेचा पोत कोणताही असला तरी नियमितपणे स्वच्छ चेहरा धुतला पाहिजे. विशेषत: रात्री झोपताना चेहरा नीट धुवावा. चेहरा धुताना या टेप्स नीट फॉलो कराव्यात.

– चेहरा धुण्यापूर्वी प्रथम चेहऱ्यावरील मेकअप काढा. जर तुम्ही रात्री चेहरा धूत असाल तर ते आणखी महत्वाचे ठरते.

– मेकअप काढल्यानंतर तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार क्लिन्जर, फेसवॉश वापरा. लक्षात ठेवा, चेहरा धुण्यासाठी कोणताही साबणवापरू नका.

हे सुद्धा वाचा

– चेहरा धुताना जास्त गरम पाणी वापरू नका. थंड अथवा कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. जास्त गरम पाण्याने चेहरा धुतल्यास त्वचेचे नुकसान होऊ शकते.

– चेहरा स्वच्छ करण्यासाठी अनावश्यक साधनांचा वापर टाळा. बरेच लोक चेहरा स्वच्छ करण्यासाठी लूफा वगैरे गोष्टींचा वापर करतात, मात्र ते चेहऱ्यासाठी चांगले नाही. चेहरा धुण्यासाठी क्लिंजर आणि पाणी पुरेसे आहे.

– चेहरा धुताना जबड्याच्या रेषा आणि मानेकडे विशेष लक्ष द्यावे. या ठिकाणी जास्त धूळ आणि घाण असते, जी सहजासहजी दिसत नाही. चेहऱ्याला नीट मसाज करून मग तो स्वच्छ धुवावा.

– चेहरा धुतल्यानंतर त्यावर पाणी राहू देऊ नका. साध्या, स्वच्छ टॉवेलने चेहरा टिपून कोरडा करावा. मात्र चेहरा जोरजोरात घासू नका किंवा कडक टॉवेल वापरू नका. चेहऱ्यावर पाणी राहिल्याने तुमची त्वचा कोरडी होऊ शकते.

– त्यानंतर, चेहऱ्याची उघडी छिद्रे बंद करण्यासाठी टोनर वापरा. टोनिंग आणि मॉयश्चरायझिंग हे अत्यंत महत्वाचे ठरते.