नवी दिल्ली : हिवाळ्याचा ऋतू आता संपला असून उन्हाळ्याला (summer) सुरूवात झाली आहे. उन्हाची तीव्रता आता वाढू लागली असून हळूहळू हवामान उष्ण (hot weather) होऊ लागते. या दिवसांत लवकर उजाडते आणि त्यामुळे दिवसा तापमानही गरम होते. मात्र हा सूर्यप्रकाश तुमच्या त्वचेची नैसर्गिक चमक (natural glow of skin) दूर करण्यासाठी पुरेसा आहे. या दिवसात सूर्यप्रकाशामुळे आपल्या त्वचेचे सर्वात जास्त नुकसान (skin damage) होते. बहुतेक लोक मार्च महिन्यात ऊन गांभीर्याने घेत नाहीत आणि त्यांना वाटते की हे ऊन त्यांच्या त्वचेसाठी फारसे हानिकारक नाही. अशा परिस्थितीत लोक कोणत्याही संरक्षणाशिवाय सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येत राहतात आणि त्यामुळे त्यांना इतर समस्या होऊ लागतात.
पण मार्च महिन्यापूर्वी त्वचेला उन्हापासून वाचवण्यासाठी काही उपायांचा अवलंब करायला हवा, नाहीतर उन्हाळा पूर्णपणे येण्याआधीच तुमची त्वचा उन्हामुळे काळवंडू शकतेत. त्वचेची नैसर्गिक चमक कायम ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे ते जाणून घेऊया.
10 ते 3 चे ऊन हानिकारक
जर तुम्ही जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याप्रमाणेच मार्च महिन्यातही बाहेर फिरत असाल तर ते आजच थांबवा. कारण आता सूर्यप्रकाश आणि ऊन वाढले आहे. तुम्हाला आता लगेच ते कदाचित जाणवणार नाही पण, सकाळी10 ते दुपारी 3 पर्यंतचे ऊन अतिशय तीव्र आणि घातक असते. त्यामुळे त्वचा काळवंडू शकते व चमकही कमी होऊ शकते. गरज नसेल तर या काळात उन्हात बाहेर पडू नका. बाहेर जाणे खूपच महत्वाचे असेल तर संपूर्ण काळजी घ्या.
संपूर्ण अंग झाकणारे कपडे घाला
जर तुम्हाला काही कामासाठी घराबाहेर जावे लागत असेल तर तुमचं शरीर संपूर्ण झाकणारे कपडे घाला. शरीराच्या कोणत्याही भागाला थेट ऊन लागणार नाही याची काळजी घ्या. पूर्ण बाह्यांचे शर्ट, कुर्ते, फुल पॅन्ट्स किंवा सलवार घाला. तसेच डोळ्यांना गॉगल लावा आणि डोक्यावर स्कार्फ किंवा टोपी घाला. तुम्हाला हवे असेल तर उन्हापासून वाचण्यासाठी छत्रीचाही वापर करू शकता.
पुरेसे पाणी पिणे त्वचेसाठी फायदेशीर
उन्हाळ्यात उन्हापासून वाचण्यासाठी व डिहायड्रेशन होऊ नये यासाठी पुरेसे पाणी प्यावे. दिवसभरात कमीत कमी 7 ते 8 ग्लास पाणी प्यायले पाहिजे. तसेच थंडावा मिळावा म्हणून आपण वारंवार चेहरा धुतो. परंतु काही पाणी, विशेषत: बोअरवेलमधून सोडले जाणारे पाणी, त्वचेसाठी थोडे कठोर असते. या पाण्यामुळे केवळ कोरडेपणा सारख्या समस्याच उद्भवत नाहीत तर त्वचेची चमकही कमी होऊ शकते. म्हणूनच तुमच्या त्वचेनुसार योग्य पाण्याचा वापर करणे महत्त्वाचे आहे.
सनस्क्रीन आणि गॉगलचा वापर
आपल्या शरीराचे काही भाग असे आहेत जे उघडे राहतात आणि या ते सूर्याच्या अधिक संपर्कात येतात. अशावेळी शरीराचे हे भाग सनस्क्रीनने झाकले जाऊ शकतात. याशिवाय डोळ्यांसाठी काळा गॉगल वापरता येतो. तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार योग्य सनस्क्रीन निवडण्यासाठी त्वचा तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
योग्य आहार आवश्यक आहे
उन्हाळ्यात त्वचा निरोगी ठेवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणेही गरजेचे आहे. उन्हाळ्यात शरीराला पाण्याचा पुरवठा होईल असा आहार घ्या. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसात भरपूर फळे आणि भाज्या आणि त्यांचे ज्यूस यांचा आहारात समावेश करावा.