नवी दिल्ली : हेअर डाय (hair dye) किंवा हेअर कलर (hair color) वापरणे हे आजकाल खूप कॉमन आहे. पण त्याचा वापर केल्यानंतर केसांची योग्य काळजी कशी घ्यावी हे फार कमी लोकांना माहिती असते. योग्य काळजी न घेतल्यास ते कोरडे (dry hair) होऊ लागतात आणि त्यांची चमकही नाहीशी होते व ते निर्जीव दिसू लागतात. जर तुम्ही केस काळे करण्यासाठी हेअर कलरचा नियमित वापर करत असाल तर त्यामध्ये असलेले केमिकल (chemicals) तुमच्या केसांना सहजपणे खराब करू शकतात आणि ते कमकुवत होऊ शकतात. अशा समस्या टाळण्यासाठी काय करावे, केसांची योग्य काळजी कशी घ्यावी, ते जाणून घेऊया.
वारंवार केस धुणे टाळावे – जर तुम्ही हेअर कलर केला असाल तर केस दररोज धुवू नका, आठवड्यातून दोनदा किंवा एकदाच शांपूचा वापर करा. आवश्यक असल्यास, ड्राय शांपू वापरा. असे केल्याने केमिकलयुक्त हेअर कलरचा पुन्हापुन्हा वापर करावा लागणार नाही.
कंडिशनरचा वापर – तुम्ही शांपूने केस धुतले नाहीत तरी केसांना कंडिशनर लावा. असे केल्याने केस मऊ राहतील आणि ते सहजपणे तुटणे टळेल. अशाप्रकारे, तुमच्या केसांचा रंग देखील बराच काळ टिकेल.
योग्य शांपूचा वापर – शांपू निवडण्यापूर्वी हे लक्षात ठेवा की तुम्ही फक्त तोच शांपू वापरा ज्यात हानिकारक रसायने नसतील. उदाहरणार्थ, तुम्ही सल्फेट-मुक्त शांपू वापरू शकता कारण ते केसांना हायड्रेट ठेवण्याचे काम करतात. याशिवायशांपूमधील सॅलिसिलिक ॲसिड आणि केटोकोनाझोलसारखी मजबूत रसायने यामुळे केस कोरडे होतात.
नीट केस धुवा – केसांना हेअर डाय लावल्यानंतर अनेकांच्या डोक्यात खाज येण्याची तक्रार असते. हेअर डाय केसांना नीट सूट न झाल्यामुळे किंवा केस व्यवस्थित न धुल्यामुळे ही समस्या उद्भवते. त्यामुळे डाय केल्यानंतर केस पाण्याने चांगले धुवावेत.
हीट प्रोटेक्शनचा वापर – हेअर स्टाइल करण्यापूर्वी जर तुम्ही हीट प्रोटेक्शनचा वापर करत असाल तर तुमचे केस खराब होण्यापासून वाचतात आणि केस कोरडे होत नाहीत. म्हणूनच तुम्ही हीट प्रोटेक्शनचा वापर करणे आवश्यक आहे.
हेअर मास्क आवश्यक – रंगलेल्या केसांना अतिरिक्त पोषण आवश्यक असते. म्हणूनच हेअर मास्क वापरणे आवश्यक आहे. हे केसांना आतून पोषण देते ज्यामुळे केस मजबूत होतात. यासाठी केसांमध्ये केळी, शिया बटर, खोबरेल तेल, दही इत्यादी वापरू शकता.
एअर ड्राय आवश्यक – केस धुतल्यानंतर हेअर ड्रायरने केस कोरडे केले तर केस खराब होतात. म्हणूनच हे महत्वाचे आहे की तुम्ही त्यांना स्वतःच सुकवू द्या. यामुळे केसांची आर्द्रता उडून जाणार नाही आणि केस मऊ राहतील.