बाईकने लडाखला जायचा आखताय प्लान ? या टिप्स बिलकूल विसरू नका

| Updated on: May 27, 2024 | 3:10 PM

बऱ्याच लोकांना ट्रेन किंवा फ्लाईटऐवजी बाईकवरून प्रवास करायला आवडतो. काही लोक दिल्ली ते लडाख प्रवासासाठी सुद्धा बाईकटा वापर करतात. जर तुम्हीदेखील बाईकवरून लेह-लडाख पर्यंत जाणार असाल तर या गोष्टी नक्की लक्षात ठेवा.

बाईकने लडाखला जायचा आखताय प्लान ? या टिप्स बिलकूल विसरू नका
Follow us on

आपल्यापैकी बऱ्याच लोकांना बाईक चालवण्याची आणि फिरण्याची आवड असते. त्यामुळे काही लोक एकेकटे तर काही जण मित्रासोंबत बाहेर ट्रीपला जाण्याचा प्लान आखतात. अशा ट्रीप्सची मजा काही औरच असते. पण ते एखाद्या साहसी मोहिमेइतकेच कठीण असते. बरेचसे लोक दिल्लीहून लडाखला बाईकने जाण्याचा प्लान आखतात. ही ट्रीप तर सुंदर आहेच. वाटेत अनेक गावं, सुंदर डोंगर आणि दऱ्या यांसारखी दृश्य दिसतात, निसर्गाचा आनंद लुटता येतो.

पण सगळाच प्रवास काही सोपा नसतो, काही वेळी अडथळ्यांचाही सामना करावा लागू शकतो. काही ठिकाणी त्रास होऊ शकतो. जर तुम्ही देखील बाईकवरून लडाख किंवा एखाद्या डोंगराळ भागात जाण्याचा प्लान आखात असाल तर निघण्यापूर्वी काही महत्वाच्या गोष्टी जाणून, समजून घ्या. जे खूप महत्लाचे असू शकते. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ते महतवाचे आहेच पण त्यामुळे तुमचा प्रवासही सहज, सुलभ होऊ शकतो. त्यामुळे प्रवासाला जाण्यापूर्वी या टिप्स नक्की वाचा आणि फॉलो करा.

रस्त्यांबाबत नीट माहिती घ्या

तुमचा प्रवास सोपा आणि सुरक्षित होण्यासाठी कोणत्याही ट्रीपला जाण्यापूर्वी, तेथील मार्गांबद्दल माहिती असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे सहलीला जाण्यापूर्वी रस्त्याचा नीट अभ्यास करून जा. प्रवास करताना तुम्हाला कुठे राहायचे आहे, खाण्या-पिण्याची सोय कुठे, काय आहे याबद्दलही संशोधन करा. शक्य असल्यास त्या ठिकाणी पूर्वी बाईकवरून गेलेल्या व्यक्तीकडून माहिती घ्या. ते तुम्हाला व्यवस्थित माहिती सांगू शकतील.

शारीरिक काळजी कशी घ्यावी

लेह, लडाख किंवा कोणत्याही डोंगराळ ठिकाणी बाईकने जाण्यापूर्वी तुमच्या शारीरिक आरोग्याविषयी जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. म्हणून, एखाद्या तज्ञाशी सल्लामसलत करा, तसेच काही महत्त्वाच्या चाचण्या करून घ्या आणि प्रवासाला जाताना आणि आवश्यक औषधे आणि फर्स्ट-एड बॉक्स आठवणीने सोबत ठेवा. तुम्हाला कोणत्याही प्रकारची आरोग्य समस्या असल्यास प्रथम तज्ञांचा सल्ला घ्या , मगच प्रवासाला निघा.

पुरेसे पैसे सोबत ठेवा

लेह लडाखला जाताना पुरेसे पैसे, रोख रक्कम सोबत नेण्यास विसरू नका. कारण अनेक ठिकाणी नेटवर्क नसते,त्यामुळे ऑनलाइन पेमेंट करण्यात अडचण येऊ शकते. एटीएममधून पैसे काढणेदेखील नेहमीच शक्य होईल असे नाही. त्यामुळे वाटेत प्रवास करताना सोबत पुरेशी रोख रक्कम ठेवावी. गरज पडल्यास त्याचा नीट उपयोग होईल.

गरजेचे सामान अवश्य सोबत ठेवा

अशा प्रवासाला जाताना तुमच्यासोबत सर्व महत्त्वाच्या वस्तू ठेवा. लवकर खराब न होणारे अन्नपदार्थ आणि कधीही खाता येतील असे पदार्थ सोबत ठेवा. बाईकवरून प्रवास करताना चांगल्या दर्जाचे हेल्मेट आणि सेफ्टी गियर घालावे. तसेच बाईकमध्ये पुरेसे पेट्रोलवर आहे ना हेही नीट तपासून घ्या. पुढील पेट्रोल पंप किती अंतरावर आहे, याचीही नीट माहिती ठेवा.