New Year: तणावामुळे त्रस्त असाल तर करा योग

| Updated on: Dec 22, 2022 | 1:50 PM

योग केल्याने आपला मेंदू तल्लख होतो. योगासनांच्या मदतीने तणावावर नियंत्रण मिळवता येऊ शकते.

New Year: तणावामुळे त्रस्त असाल तर करा योग
Image Credit source: Freepik
Follow us on

नवी दिल्ली – जर आपल्याला समाधान आणि शांती (peaceful mind) हवी असेल तर मेडिटेशन (meditation) केल्याने मदत होऊ शकते. योगासने आणि इतर गोष्टींनी आपले मन मजबूत होते तसेच मन शांतही होते. जेव्हा आपले मन शांत असते, तेव्हा आपण कोणताही निर्णय योग्य पद्धतीने घेऊ शकतो. योगासनांच्या (yog) मदतीने तणावावर नियंत्रण मिळवता येऊ शकते.

मेडिटेशन करावे

लक्ष केंद्रित करण्यासाठी ध्यान म्हणजेच मेडिटेशन हा एक उत्तम पर्याय आहे. त्याचा नियमितपणे सराव केल्यास आपण स्वतःमध्ये जागरूकता विकसित करू लागतो. जेव्हा आपले मन शांत आणि स्थिर असते, तेव्हा मेडिटेशन अधिक चांगले व योग्य पद्धतीने होते. ध्यान केल्याने आपल्याला आपला उद्देश शोधण्यासाठी किंवा ध्येय साध्य करण्यासाठी चांगली ऊर्जा मिळते.

हे सुद्धा वाचा

प्राणायम

प्रत्येक व्यक्तीने रोज प्राणायाम करण्याचा प्रयत्न करावा. शरीरातील उर्जेचे मुख्य स्त्रोत शुद्ध करणे हा प्राणायामाचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे मनाला शांती तर मिळतेच पण आपली एक्रागता वाढवण्यासही ते उपयुक्त आहे. याव्यतिरिक्त, मेडिटेशनमुळे चैतन्य वाढते आणि तणाव व चिंतेची पातळी कमी होते.

स्वत:ला शिस्त लावावी

एकदा आपलं मन शांत झालं की आपण न थांबता आपल्या ध्येयाकडे वाटचाल करतो. मात्र त्यासाठी स्वतःला शिस्त लावणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्या दैनंदिन कामांची यादी तयार करावी आणि ती वेळेवर पूर्ण करण्याचाही प्रयत्न करावा. शिस्तीमुळे आयुष्याला एक चांगले वळण लागते.

सकारात्मक रहा

सकारात्मक राहून आपण आपले जीवन बदलू शकतो. त्यासाठी आपल्या सभोवतालचे वातावरण प्रसन्न ठेवणे सर्वात महत्त्वाचे असते. तुमच्या मनावर नकारात्मकतेचा प्रभाव पडू देऊ नका, नेहमी सकारात्मक विचार करावा. तसेच कालानुरूप सवयी बदलत रहाव्यात, चांगल्या सवयी आत्मसात कराव्यात.

( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)