मुंबई : धावपळीचे आयुष्य आणि बदलत्या जीवनशैलीत सगळेच आपले शरीर निरोगी राहावे म्हणून प्रयत्न करत असतात. परंतु, जर आपल्याला देखील चांगले शरीर हवे असेल, तर व्यायामासह आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलण्याची देखील आवश्यकता आहे. अशावेळी आपण काय खावे? कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश केला तर आपल्या शरीराच्या दृष्टीने योग्य राहील? असा विचार सगळेच करत असतात. तुम्हाला देखील असेच प्रश्न पडले असतील, तर काळजी करू नका. आम्ही तुम्हाला अशा काही पदार्थांबद्दल सांगणार आहोत, ज्यांचा आहारात समावेश केल्याने तुम्ही नेहमी निरोगी राहू शकाल…(Food For Health and fit body)
अंडी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. अंड्यात 75 कॅलरी, 8 ग्रॅम प्रथिने, 5 ग्रॅम चरबी, व्हिटामिन बी, सेलेनियम आणि व्हिटामिन ए, डी आणि ई ही जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. तसेच यात आढळणारा कोलीन हा एक असा पौष्टिक घटक आहे, जो मेंदूच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. अंड्यामध्ये काही प्रमाणात कोलेस्ट्रॉल असते, परंतु त्यात संतृप्त चरबी कमी असते.
दही दुधापासून बनवला जाते. म्हणून, त्यातही भरपूर प्रमाणात पोषक घटक असतात. तीन चतुर्थांश दह्यामध्ये सुमारे 9 ग्रॅम प्रथिने असतात. त्यात कॅल्शियम, व्हिटामिन बी-12, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम देखील असते. दही खाल्याने शरीराला आवश्यक असणारे कॅल्शियम मिळते. जे आपल्या हाडे आणि दातांच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे.
गाजर एक रंगीबेरंगी भाजी आहे, जी आपल्या आरोग्यासाठी खूप चांगली आहे. हे बाजारात सहज उपलब्ध असतात, शिवाय स्वस्त देखील असतात. गाजरामध्ये व्हिटामिन ए आणि फायबर असते. यासह गाजरांमध्येही पाण्याचे प्रमाणही चांगले आहे. यामुळे शरीर हायड्रेट राहते. लहान मुलांनादेखील गाजर खाणे खूप आवडते. भाजी, तिखट सांजा आणि हलवा या सारख्या पदार्थात समाविष्ट करून खाल्ले जाऊ शकते (Food For Health and fit body).
नट्स केवळ अन्नाची चवच वाढवत नाहीत तर, हे एक असे अन्न आहे ज्यात भरपूर प्रथिने आणि नैसर्गिक चरबी आहे. यात ओमेगा 3 फॅट्स, फायबर, व्हिटामिन ई, अमीनो आम्ल असतात. हे सर्व पोषक घटक हृदय, स्नायू आणि मेंदूच्या आरोग्यासाठी चांगले असतात. बदाम, अक्रोड, पिस्ता आणि काजू सारख्या नट्सचा आपल्या आहारात समावेश करावा.
सफरचंद या फळामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि पाणी भरपूर प्रमाणात असतात. शिवाय त्यात अँटी ऑक्सिडंट आणि फ्लेव्होनॉइड देखील असतात. सफरचंद फक्त खायलाच चवदार नाही, तर त्यामुळे त्वचा देखील खूप निरोगी होते. सफरचंदांचे बरेच प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. जे तुम्ही खाऊ शकता किंवा त्याचा रस बनवून पिऊ शकता.
(Food For Health and fit body)
Warm Water Benefits | केवळ वजन नियंत्रणच नव्हे तर, गरम पाण्यामुळे शरीराला होतील अनेक फायदे!https://t.co/z1w6xfCCBd#WarmWater #healthylifestyle #health
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 17, 2020