उन्हाळ्यात कडक सूर्यप्रकाशामुळे त्वचा निर्जीव (Inanimate) आणि निस्तेज होते. अशा वेळी उन्हाळ्यात येणाऱया काही हंगामी फळांचा (seasonal fruits) वापर करून, आपण त्वचेला तजेला देऊ शकतो. टरबूज हे फळ हे आपल्याला उन्ह्याळ्यातील हंगामी ऍलर्जी आणि संक्रमणांपासून संरक्षण करण्यास मदत करते. त्वचेसाठीही ते खूप फायदेशीर आहे. तुम्ही टरबूजचा वापर फेस मास्क म्हणूनही करू शकता. तुम्ही नैसर्गिक घटक (Natural ingredients)वापरून विविध प्रकारचे फेस मास्क बनवू शकता. जास्त सूर्यप्रकाशामुळे मेलॅनिन तयार होतो. त्यामुळे त्वचा काळी पडते. त्वचेवर टॅन दिसतात. अशा परिस्थितीत तुम्ही टरबूजाचा रस आणि मध वापरून फेस पॅक बनवू शकता. फेस पॅक बनविण्यासाठी टरबूजाचा रस आणि मध हे दोन्ही समान प्रमाणात घ्या. एकत्र मिसळा. ते त्वचेवर लावा. 20 ते 25 मिनिटे त्वचेवर राहू द्या. ताज्या थंड पाण्याने ते धुवा.
दही केवळ आपल्या आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही फायदेशीर आहे. हे त्वचा चमकदार बनवण्याचे काम करते. हा फेस मास्क बनवण्यासाठी एक लहान भांड घ्या, त्यात एक चमचा दही घाला. त्यात अर्धा कप टरबूजाचा रस घालून, ते चांगले मिसळा. हा मास्क तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. 20 मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर थंड पाण्याने धुवा.
लिंबू मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्याचे काम करते. लिंबाचा रस आणि टरबूजाचा रस मिसळूनही तुम्ही फेस मास्क बनवू शकता. यासाठी एका लहान भांड्यात दोन चमचे टरबूजाचा रस घ्या. त्यात एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा मध घालून, ते चांगले मिसळा. हा फेस मास्क तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. 10 ते 15 मिनिटे त्वचेवर राहू द्या. त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवा. मध तुमच्या त्वचेला मॉइश्चरायझ करण्याचे काम करते.
हा फेस मास्क बनवण्यासाठी एका भांड्यात एक चमचा टरबूजाचा रस घ्या. त्यात एक चमचा कच्चे दूध घालून चांगले मिसळा आणि चेहरा धुतल्यावर चेहऱ्यावर लावा. 20 ते 25 मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर ते थंड पाण्याने धुवा.
वरील टीप्स फॉलो करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक घ्यावा.)
Skin care : कडुलिंबाचे हे फेसपॅक चेहऱ्याला लावा आणि त्वचेच्या सर्व समस्या लगेचच दूर करा!
Skin Care : उन्हाळ्यात त्वचेला हायड्रेट ठेवायचे आहे? मग हे घरगुती उपाय करा आणि फरक पाहा!
Hair Care Tips : ग्लिसरीन फक्त त्वचेसाठीच नाहीतर केसांसाठीही अत्यंत फायदेशीर, वाचा!