नवी दिल्ली – हिवाळ्याच्या दिवसांत चेहऱ्यावरील कोरडेपणा (dry skin) दूर करण्यासाठी त्वचेची काळजी घेणे (skin care) खूप गरजेचे असते. या ऋतूमध्ये चेहऱ्यावरील हरवलेली चमक परत मिळवण्यासाठी महिला अनेकदा ब्युटी पार्लरमध्ये जातात. पण काहींना यासाठीही वेळ मिळत नाही. तुम्हालाही अशी समस्या सतावते का ? जर तुमच्याकडेही कमी वेळ असेल तर तुम्ही घरच्या घरी क्रीमचा (साय) वापर (cream facial) करून मुलायम त्वचा मिळवू शकाल.
क्रीममध्ये (साय) लॅक्टिक ॲसिड आढळते, ज्यामुळे आपली त्वचा हायड्रेटेड राहते. क्रीम फेशिअलचा वापर करून चेहरा चमकवता येऊ शकेल.
क्लींजिंग
एका वाटीत एक चमचा डाळीचे पीठ (बेसन) घेऊन त्यामध्ये साय घालावी. दोन्ही घटक नीट एकत्र करून चेहरा व मानेवर लावावे. थोडा वेळ चेहऱ्याचा मसाज करावा. नंतर साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा.
स्क्रबिंग
यासाठी एका वाटीत दोन चमचे ओट्स पावडर आणि एक चमचा साय घालून नीट मिसळावे. हे तयार स्क्रब चेहरा व मानेवर नीट लावून स्क्रबिंग करावे. 10 मिनिटांनी चेहरा साध्या पाण्याने नीट धुवून घ्यावा.
वाफ घेणे
एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन ते उकळायला ठेवावे. नंतर डोकं व चेहरा टॉवेलने झाकून घ्यावे व पाण्याची वाफ घ्यावी. अशा पद्धतीने संपूर्ण चेहऱ्यावर वाफ येईल.
फेस पॅक
एका भांड्यात अर्धं केळं घेऊन ते मॅश करावे आणि त्यात एक चमचा साय घालावी. दोन्ही गोष्टी नीट मिक्स करून फेस पॅक चेहऱ्यावर आणि मानेला लावा. याने 10 ते 15 मिनिटे चेहऱ्यावर मसाज करा. त्यानंतर चेहरा साध्या पाण्याने धुवा.
मसाज करणे
एका भांड्यात दोन चमचे फ्रेश साय घ्यावी व त्यात ऑलिव्ह ऑईलचे काही थेंब घालावे. या दोन्ही गोष्टी मिक्स केल्यानंतर चेहरा आणि मानेला मसाज करा. हे मिश्रण चेहऱ्यावर 20 मिनिटे तसेच राहू द्यावे. नंतर ओल्या टॉवेलने चेहरा स्वच्छ पुसून घ्यावा.