मुंबई : आतापर्यंत तुम्ही कधी पाहिलच नाहीतर ऐकलही नसेल की रक्ताचा रंग लाल नाहीतर आणखी दुसरा कोणतातरी आहे. शास्त्रज्ञांनी अनेक शोध लावले मात्र त्यांना कृत्रिम पद्धतीने रक्त तयार करता आलं नाही. कायम बोललं जातं की, देवाने प्रत्येकाच्या रंगाचा रक्त हा लाल बनवला आहे. पण तुम्हाला माहित आहे का रक्ताचा रंग हा लालच नाहीतर निळा आणि हिरवाही आहे. मानवाच्याच शरीरात रक्त हे लाल रंगाचं असतं असं नाही तर या पृथ्वी तलावावर असे काही प्राणी आहेत की ज्यांच्या रक्ताचा रंग लाल नसून वेगळा आहे.
लाल रंग हे मानवाव्यतिरिक्त पृष्ठवंशी प्राण्यांमध्ये आढळतं. या रक्ताच्या रासायनिक मिश्रणाला हिमोग्लोबिन असे म्हणतात. हिमोग्लोबिन रक्तातील महत्त्वाचा घटक आहे. यामध्ये लोह मोठ्या प्रमाणात आढळतं. लोहामुळे रक्त लाल रंगाचं होतं, हे मिश्रण ऑक्सिजनसोबत मिक्स होतं त्यावेळी डीआॕक्सिजनयुक्त झाल्याने रक्ताचा रंग हा लालच राहतो.
निळे रक्त हे सामान्यतः समुद्री प्राण्यांमध्ये आढळते. उदाहरणार्थ, ऑक्टोपस, स्क्विड्स, मोलस्क, क्रस्टेशियन आणि स्पायडरमध्ये. हेमोसायनिन हे रक्त निळे होण्याचे कारण आहे. हिमोग्लोबिन रक्तातील लाल रक्तपेशींना चिकटून राहते. पण हेमोसायनिन रक्तात मुक्तपणे वाहते. हिमोसायनिनमध्ये लोहाऐवजी तांबे असतं. वास्तविक हे रक्त कोणत्याही रंगाशिवाय आहे. पण त्यात ऑक्सिजन मिसळला की तांब्याच्या प्रभावामुळे तो निळा होतो.
काही प्राण्यांच्या शरीरात हिरवं रक्त कमी असतं. हे आकाराने खूप लहान असतात. गांडुळे, लीचेस आणि समुद्री गांडुळे यांच्या रक्तामध्ये क्लोरोक्रूरिन सापडतं. प्राण्यांच्या शरीरात हे मानवाच्या शरीरातील हिमोग्लोबिनसारखं काम करतं. हिमोग्लोबिन आणि क्लोरोक्रुओरिन हे दोन्ही जीव काही प्रजातींमध्ये आढळतात. जोपर्यंत या प्राण्यांना ऑक्सिजन मिळत नाही तोपर्यंत यांच्या रक्ताचा रंग हिरवा असतो मात्र जेव्हा यांना ऑक्सिजन मिळाला की गडद हिरवा होतो.
जांभळं रक्त हे सागरी गांडुळांमध्ये आढळतं, यामध्ये पीनट वर्म, पेनिस वर्म आणि ब्रॅचिओपॉड्स हे प्राणी आढळतात. त्यांच्या रक्तात हेमेरिथ्रीन असतं, हेमियरिथ्रिन जोपर्यंत रक्ताच्या संपर्कामध्ये येत नाही तोपर्यंत ते रंगहीन असतं. ऑक्सिजन मिळालं की या प्राण्यांच्या रक्ताचा रंग जांभळा होतो.