नवी दिल्ली : सरकारच्या आदेशानुसार हॉटेल-रेस्टॉरंटच्या मेन्यूकार्डमध्ये आता बदल होणार आहेत. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अॅथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात FSSAI ने मोठं पाऊल टाकलं आहे. सरकारच्या या आदेशानुसार आता नवीन मेन्यूकार्डमध्ये हॉटेल-रेस्टॉरंट मालकांना अन्नाची न्यूट्रीशन व्हॅल्यू (पोषण मूल्य) लिहावी लागणार आहे. (FSSI rules Hotel restaurant Food labelling)
हॉटेल-रेस्टॉरंटमध्ये जे पदार्थ बनवले गेले त्यामध्ये किती कॅलरीज आहेत, याचीही नोंद मेन्यूकार्डमध्ये अनिवार्य केली गेली आहे. जे लोक कॅलरीजच्या प्रमाणानुसार खातात त्यांना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे. कॅलरीव्यतिरिक्त हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील अन्नातील पोषक तत्त्वांचा उल्लेखही मेन्यूकार्डमध्ये करणं आवश्यक असेल. पोषण तत्वानुसार कोणता पदार्थ शरीरासाठी चांगला असेल, याचा लोकांना एकंदरित अंदाज येईल.
आतापर्यंत आपण हॉटेल रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर मेन्यू कार्डमध्ये केवळ पदार्थाचं नाव आणि त्याची किंमत एवढंच नमूद केलेलं असायचं. मात्र आता संबंधित पदार्थामध्ये किती कॅलरीज आहेत आणि पोषण तत्वे कोणती आहेत, याची माहिती मेन्यू कार्डवर असणार आहेत. यामुळे लोकांना जेवढ्या कॅलरीजचं जेवण खायचं असेल तेवढ्याच कॅलरीज जेवण ते खाऊ शकतील किंबहुना ऑर्डर करु शकतील. लोकांना पहिलंच जर कॅलरीजविषयी कळालं तर त्यांना पाहिजे तेवढ्या कॅलरीज जेवण करता येणं, सोपं होईल.
भारत सरकारने ठरविलेल्या या नियमात सर्व हॉटेल आणि रेस्टॉरंट्स येणार नाहीत. आत्ता हा नियम फक्त त्या रेस्टॉरंट्सवर लागू होईल ज्यांच्या 10 हून अधिक साखळ्या आहेत. वास्तविक, या नियमाची मागणी बर्याच काळापासून मागणी केली जात होती जेणेकरुन लोक पैसे खर्च करुन हॉटेल रेस्टॉरंटमध्ये जेवण करतात तर त्यांना सुरक्षित आणि आरोग्यदायी अन्नाची हमी मिळायला हवी.
(FSSI rules Hotel restaurant Food labelling)
संबंधित बातम्या
International Tea Day | भारतात चहाची सुरुवात कशी झाली? जाणून घ्या तुमच्या चहाचा रंजक इतिहास