मुंबई : आले आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आपल्या सर्वांनाच ही गोष्ट माहित आहे. परंतु, आपल्याला हे माहित आहे का की, आले केवळ आरोग्यासाठीच नाहीतर त्वचा आणि केसांसाठी देखील खूप फायदेशीर आहे. आले आपल्या त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर करण्याचे काम करते. आल्याचा रस त्वचेवरील डाग, सुरकुत्या, मुरुम कमी करतो (Ginger helpful for skin and hairs problem).
आल्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे, झिंक यासारखे बरेच पौष्टिक घटक आढळतात, जे त्वचेला पोषण देण्याचे काम करतात. चला तर, जाणून घेऊया आल्यामुळे आपले केस आणि त्वचेची समस्या कशाप्रकारे दूर होतील…
आल्यामध्ये अँटी-एजिंग गुणधर्म आहेत, जे मुरुम आणि डाग काढून टाकण्यास मदत करतात. आपण कॉटन बॉलच्या मदतीने चेहऱ्यावर आल्याचा रस लावू शकता. याशिवाय आपण आल्याचा फेस स्क्रब देखील बनवू शकता. आल्याचा फेस स्क्रब बनवण्यासाठी 2 चमचे ऑलिव्ह तेल, थोडासे आले, 3 चमचे ब्राऊन सुगर या सगळ्यांचे बारीक वाटून हे मिश्रण एका वाटीत काढून घ्या. यानंतर ही पेस्ट चेहर्यावर लावा. चेहऱ्यावर हा आल्याचा स्क्रब लावा आणि गोलाकार मोशनमध्ये मसाज करा. यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. काही दिवसांतच याचा फायदा दिसून येईल.
चेहऱ्यावरील मुरुमांमुळे त्रास होत असेल, तर आले आणि मधाची पेस्ट चेहर्यावर लावा. सुमारे 15 ते 20 मिनिटे हा फेस मास्क चेहऱ्यावर लावून ठेवा. मुरुमांच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी आठवड्यातून किमान 2 वेळा हा फेसपॅक वापरा (Ginger helpful for skin and hairs problem).
हिवाळ्यातील केसांतील कोंड्याची समस्या सर्वात त्रासदायक आहे. आपणही या समस्येतून मुक्त होऊ इच्छित असल्यास, आल्याचा रस आपल्या तेलात मिसळा आणि नंतर ते केसांवर लावा. हे तेल लावल्यानंतर हलक्या हातांनी स्काल्पची मालिश करा. याशिवाय तुम्ही दह्यामध्ये आल्याचा रस घालून हे मिश्रण केसांमध्ये लावू शकता. यामुळे आपले केस मॉइश्चराइझ होतात. आल्यामुळे आपल्या केसांमधील कोंडा कमी होण्यास मदत होते.
डोळ्यांभोवतालची काळी वर्तुळे अर्थात डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी आपण आल्याचा रसाचा वापर करू शकता. आल्याच्या रसाने डोळ्यांखाली मसाज करा. मसाज करताना हा रस आपल्या डोळ्यांत जाणार नाही याची काळजी घ्या. रस डोळ्यात गेल्याने डोळ्यांना हानी होणार नाही, मात्र ते चुरचुरू लागतील.
(Ginger helpful for skin and hairs problem)
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
Hair Care | थंडीच्या दिवसांत रुक्ष केसांच्या समस्येमुळे हैराण? मग ‘हे’ हेअर मास्क नक्की ट्राय करा!https://t.co/R06JFAcxU4#HairMask #HairCare #beautytips
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 29, 2020