मुंबई : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जगभरातील सगळेच लोक फार विचलित झाले होते. परंतु, घरी राहून देखील लोक आपले मनोरंजन करत होते आणि कुटुंबातील सदस्यांसमवेत वेळ घालवत होते. यादरम्यान लोकांनी सर्वाधिक वेळ हा इंटरनेटवर काहीना काही सर्च करण्यात घालवला आहे. गुगलने देखील या काळात जगभरातील लोकांकडून शोधले गेलेले काही प्रश्न शेअर केले आहेत. मोकळ्या वेळात लोकांनी काय काय सर्च केले याची माहिती गुगलने जाहीर केली आहे (Google search declares top travel related most search questions during corona pandemic).
गुगलने वर्ष 2020मध्ये सर्वाधिक गुगल केलेल्या पर्यटन स्थळांची यादी जाहीर केली आहे. जर आपल्याला असे वाटते की, ‘कोरोना व्हायरस’ हा जगभरातील ट्रेंडिंग सर्च आहे. तर, होय आपण अगदी बरोबर आहात. यावर्षी पर्यटन उद्योगावर कोरोना विषाणूच्या संसर्गाचा सर्वात मोठा परिणाम झाला. लोकांनी प्रवासाशी संबंधित अनेक प्रश्न गुगलवर शोधले होते. ज्याची उत्तरे देखील गुगलने दिली आहेत.
एरव्हीही प्रवासाशी संबंधित प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी बऱ्याच लोकांचा मोर्चा गुगलकडे वळतो आणि अखेर गुगलने 2020 सालातील वार्षिक वर्षाच्या सर्च डेटामध्ये त्याचे अनावरण केले. यंदाच्या वर्षी घरात कैद झालेल्या लोकांनी घर बसल्या अनेक प्रवासाची ठिकाणे शोधली.
लोकांनी काही विशिष्ट प्रश्न देखील गुगलला विचारले होते. जसे मेक्सिको आणि हवाई प्रवासासाठी खुले होते की नाही? जगभरातील काही टॉप ट्रेंडिंग सर्चमध्ये “व्हर्च्युअल” फील्ड ट्रिप, संग्रहालय टूर्स आणि सर्वसाधारण पर्यटन यांचा देखील समावेश होता (Google search declares top travel related most search questions during corona pandemic).
गुगलची ब्रँड संपादकीय संचालक नेल्ली केनेडी म्हणाल्या की, ‘जवळपास गेल्या 20 वर्षांपासून, जेव्हा वर्ष संपायला येते तेव्हा Google ने जगाला शोध घेण्यास प्रवृत्त केले टॉप प्रश्न, क्षण आणि व्यक्ती यांची यादी जाहीर केली आहे.’ Google Trends डेटाने या वर्षाचा देखील आढावा घेतला. 2020मध्ये जगभरातून आतापर्यंतचे सर्वात जास्त ‘का’ असणारे प्रश्न शोधले गेले आहेत.
बातम्यांच्या सर्चमध्ये प्रामुख्याने निवडणुकांचे निकाल आणि कोरोनो व्हायरसची सद्य परिस्थिती हे टॉपला असले, तरी त्याचबरोबरीने सर्वाधिक सर्च हा ‘ट्रीप सर्च’ त्यातही विशेषतः सर्व व्हर्चुअल फिल्ड ट्रिप आणि व्हर्च्युअल संग्रहालय टूर बद्दलचे सर्च होते. या सर्च यादीत जेव्हा पाककृतींचा विषय येतो, तेव्हा जगभरातील लोकांनी व्हीप्ड कॉफी आणि सावर ब्रेड या पदार्थांचा सर्वाधिक शोध घेतला होता.
(Google search declares top travel related most search questions during corona pandemic)
New Year Celebration | नवीन वर्षाचे निमित्त साधून गोव्याला जाताय? मग ‘ही’ ठिकाणे पाहण्यास विसरू नका!https://t.co/fCellowQMJ#Goa । #GoaVacation । #TopPlaces । #NewYear2021
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 30, 2020