मुंबई : फ्रिजमधल्या शिळ्या अन्नाच्या सेवनाने एकाला त्याची गंभीर किंमत मोजावी लागली आहे. बरेचदा लोक बाहेर जेवणासाठी जात असतात. कधी कधी जेवण जास्त झाले तर ते पॅक करून घरी आणतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते शिळे पदार्थ खात असतात. असे करणे आरोग्यासाठी धोकादायक (Dangerous) ठरू शकते. एका विद्यार्थ्याने आदल्या रात्री फ्रिजमध्ये ठेवलेले पदार्थ खाल्ले, त्यानंतर तो असा आजारी (Sick) पडला की त्यांचे दोन्ही पाय कापावे लागले. उरलेले पदार्थ फ्रीजमध्ये (Fridge) ठेवले जाते आणि नंतर गरजेनुसार त्यांचा वापर होत असतो. परंतु तज्ज्ञांच्या मते, फ्रिजमध्ये जास्त वेळ अन्न ठेवू नये, यामुळे ते खराब होण्याची शक्यता असते. विद्यार्थ्याने फ्रिजमधील अन्न खाल्ल्यानंतर त्यांच्या किडनीने काम करणे बंद केले आणि त्याला गंभीर आजार झाला. प्रकृतीत सुधारणा न झाल्याने डॉक्टरांनी त्याला दुसर्या रुग्णालयातही हलवले होते.
‘न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन’च्या रिपोर्टनुसार, संबंधित विद्यार्थ्याचे नाव जेसी सांगण्यात आले आहे. त्याच्या रूमपार्टनरने आदल्या रात्री रेस्टॉरंटमधून चिकन आणि नूडल्स आणले आणि त्याने ते पदार्थ घरी आणून फ्रीजमध्ये ठेवले. दुसऱ्या दिवशी सकाळी जेसीने ते अन्न खाल्ले तेव्हा तो आजारी पडला आणि त्यानंतर त्याला खूप ताप आला. जेसीला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, जिथे त्याच्या हृदयाची गती अचानक 166 बीट्स प्रति मिनिटापर्यंत वाढली. मिळालेल्या माहितीनुसार, जेसीला कोणत्याही प्रकारची अॅलर्जी नव्हती आणि त्याने कधीही दारू प्यायली नाही. पण तो दर आठवड्याला सिगारेटची 2 पाकिटे आणि रोज गांजा घ्यायचा. त्यांची प्रकृती सतत खालावत राहिल्याने त्याला हेलिकॉप्टरने दुसऱ्या रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले.
रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी 20 तासांपर्यंत रुग्ण बरा होता, असे अहवालात म्हटले आहे. परंतु जेसीच्या पोटात दुखत मळमळ होऊ लागली. यानंतर त्याची त्वचा जांभळी होऊ लागली आणि त्याला तपासणीसाठी हॉस्पिटलच्या दुसर्या विभागात नेण्यात आले.
नंतर जेसीला बॅक्टेरियाचा संसर्ग झाल्याचे समोर आले. त्यामुळे त्याच्या किडनीने काम करणे बंद केले आणि त्याचे रक्तही जमा होऊ लागले. त्याच्या रक्तात सेप्टीकचे लक्षणं असलेले बॅक्टेरिया आढळले. जेसीच्या शरीरात सेप्टीक पसरू लागल्यावर त्याच्या हाताची सर्व बोटे कापण्यात आली. आणि गुडघ्याखालील पायही कापले गेले. 26 दिवसांनी जेसी पुन्हा शुद्धीवर आली, पण आता त्याचे आयुष्य पूर्णपणे बदलले आहे.
सेप्सिस म्हणजे काय ?
सेप्सिस हा असा आजार आहे, जो शरीरात काही प्रकारच्या संसर्गामुळे होतो. शरीरात एकदा संसर्ग झाला की, आपल्यातील रोगप्रतिकारशक्ती त्याचा सामना करत असते. परंतु काही वेळा संसर्ग जास्त वाढत गेल्यास त्यावर रोगप्रतिकारशक्तीही काम करत नाही. व तो संसर्ग अजूनच वाढत जात असतो. त्यावेळी सेप्टीक होण्याची शक्यता असते. सेप्टीकचे बहुतेक संक्रमण बॅक्टेरियामुळे होते. कोविड 19, इन्फ्लूएंझा आणि बुरशीजन्य संसर्गामुळेदेखील सेप्सिस होऊ शकतो. सेप्टीसमुळे ताप, हृदयाचे ठोके वाढणे आणि श्वास घेण्यात अडचण यासारखी इतर लक्षणे दिसून येतात. यात त्वरित उपचारांची आवश्यकता असते. त्यावर उपचार न केल्यास ते जीव जाण्याची शक्यता असते. याकडे लक्ष न दिल्यास अवयव निकामी होणे, हृदय बंद पडणे, पक्षाघात आणि मृत्यू होऊ शकतो.
काय सांगतात तुमचे डोळे? जाणून घ्या एका क्लिकवर
आईसक्रीम खाल्ल्यावर अचानक डोके दुखतेय? मेंदू सुन्न होण्याच्या समस्यापासून करा अशा प्रकारे सुटका!