मुंबई : गर्भधारणेदरम्यान, स्त्रियांचे केस सहसा दाट आणि जाड दिसतात. कारण, त्यादरम्यान शरीरात इस्ट्रोजेन हार्मोनची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते, यामुळे केस गळती प्रतिबंधित होते. परंतु, काही महिलांना यावेळी केस गळतीची मोठी समस्या देखील उद्भवते. जर, आपल्या बाबतीतही हेच घडत असेल, तर जास्त काळजी करण्याची गरज नाही. कारण, हा एक टप्पा आहे, जो काही दिवसानंतर निघून जाईल (Hair Care Tips during Pregnancy).
कधीकधी हे हार्मोनल चढउतारांमुळे ही समस्या येते. अशा परिस्थितीत, आंघोळ करताना किंवा केस विंचरताना केसांचे पुंजके पडतात. गर्भावस्थेदरम्यान ही समस्या लोह, झिंक आणि फोलिक आम्ल, थायरॉईड या सारख्या पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे आणि आनुवंशिकतेमुळे देखील होऊ शकते. चला तर, अशा परिस्थितीत केसांची काळजी कशी घ्यावी, हे जाणून घेऊया…
– गरोदरपणात केसांची काळजी घेण्याचा उत्तम मार्ग म्हणजे तेलाने मालिश करणे. आठवड्यातून किमान तीन ते चार वेळा आपल्या केसांना तेल लावा. ऑलिव्ह, नारळ आणि बदाम तेल केसांच्या मसाजसाठी खूप चांगले आहे. यामुळे केसांची मुळे मजबूत होतात आणि केस गळतीला प्रतिबंधित करतात.
– कोरफड जेलने केसांच्या स्काल्पला 10 मिनिटे मसाज करा आणि ते केसांवर 15 मिनिटे तसेच सोडा. यानंतर आपले केस पाण्याने स्वच्छ धुवा. एलोवेरा जेलमधील एंजाइम कोणत्याही प्रकारचे संसर्ग रोखून स्काल्प खराब होण्यापासून आणि केस गळण्यापासून रोखतात (Hair Care Tips during Pregnancy).
– एका भांड्यात एक अंडे चांगले फेटून घ्या. त्यात एका लिंबाचा रस मिक्स करा आणि पुन्हा चांगले फेटा. या मिश्रणाने स्काल्पची मालिश करा, त्यानंतर केस स्वच्छ धुवा. अंड्यात प्रथिने असतात आणि लिंबामध्ये व्हिटामिन सी असते, जे केस गळती रोखण्यास मदत करते.
– रात्रभर अर्धा कप पाण्यामध्ये मेथीदाणे भिजवून, सकाळी त्याची बारीक पेस्ट करून केसांच्या मुळांपासून संपूर्ण केसांना लावा. दोन ते तीन तास तसेच सोडा. यानंतर केस धुवा.
– जेव्हा जेव्हा कोणत्याही तेलाने केसांचा मसाज कराल, तेव्हा गरम टॉवेलने केस बांधा. यामुळे केसांना तेलाचा दुहेरी प्रभाव मिळेल आणि केसांना पोषण देखील मिळेल.
जेव्हा आपण आपले केस धुता, तेव्हा फक्त सौम्य शॅम्पू वापरा. केस धुतल्यानंतर कंडिशनर वापरा. परंतु, केसांच्या मुळांवर कंडिशनर लावू नका. गरोदरपणात केसांवर रंग किंवा डाय लावणे शक्यतो टाळा.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
(Hair Care Tips during Pregnancy)
Skin Care | चेहऱ्यावर चुकूनही लावू नका ‘या’ गोष्टी, अन्यथा होऊ शकते त्वचेचे नुकसान!
Dieting Side Effects | डाएटिंग करताय? ‘ही’ लक्षणे दिसताच त्वरित थांबणे ठरेल फायदेशीर!
Jamun Seeds | मधुमेहाच्या रुग्णांसाठी संजीवनी ठरतील जांभळाच्या बिया, ‘या’ समस्यांवरही उपयोगी!#JamunSeeds | #diabetes | #health | #foodhttps://t.co/kZyjVRjoYD
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 25, 2021