मुलगा असो वा मुलगी केसांमुळे आपले सौंदर्या आणखीन खुलून दिसते. त्यामुळे केस निरोगी ठेवण्यासाठी प्रत्येकजण विविध उपाय करतच असतात. केस मऊ आणि चमकदार करण्यासाठी केराटिनसारखे अनेक कॉस्मेटिक ट्रीटमेंट पार्लरमध्ये उपलब्ध असले तरी एकदा करून घेतल्यानंतर कमीत कमी 3 ते 6 महिन्यांनी पुन्हा ट्रीटमेंट करावी लागते . त्याचबरोबर काही महिला हेअर स्पा 15 दिवस किंवा महिन्याभरात करून घेत असतात. जसजसे हवामान बदलते तसतसे स्किनकेअरपासून केसांची काळजी घेण्यापर्यंत बदल आपण करत असतो, त्यामुळ हिवाळ्यात हेअर स्पा करता येईल की नाही, असा प्रश्न अनेक महिलांना असतो. हिवाळ्यात केसांमधील कोरडेपणा वाढल्याने आपण खूपदा त्रस्त झालेले पाहायला मिळते. अशावेळी केस गुळगुळीत करण्यासाठी लोक कॉस्मेटिक ट्रीटमेंट, विशेषत: हेअर स्पाचा आधार घेतात, तर चला जाणून घेऊया हेअर स्पा प्रोसेस काय आहे आणि हिवाळ्यात ती करता येते की नाही.
हेअर स्पा म्हणजे काय?
खरं तर इतर कॉस्मेटिक हेअर ट्रीटमेंटच्या तुलनेत हेअर स्पामध्ये अधिक रसायनांचा वापर केला जात नाही. पण हेअर स्पा करण्यासाठी क्रीमचा वापर केला जातो. स्पा प्रक्रियेत प्रथम सौम्य शॅम्पूने तुमचे केस स्वच्छ केले जातात आणि नंतर केस कोरडे झाल्यावर केसांना स्पा क्रीमचा थर लावला जातो. थोड्यावेळाने क्रीम सुकल्यानंतर केसांना स्टीम दिली जाते. त्यानंतर पाण्याने केस धुवून केसांना पुन्हा कंडिशनर लावून केस स्वच्छ धुतात. अशा प्रकारे स्पा प्रक्रियेत केसांना डीप कंडिशनिंग केले जाते.
हिवाळ्यात हेअर स्पा घ्यावा की नाही?
हिवाळ्यात तुमच्या केसांचा कोरडेपणा कमी करण्यासाठी आणि ते मऊ आणि नैसर्गिक चमकदार राहण्यासाठी तुम्ही हेअर स्पा करू शकतात. हिवाळ्यात कोरड्या केसांच्या समस्या दूर करण्यासाठी हेअर स्पा हा एक उत्तम पर्याय आहे, कारण यामुळे केसांना डीप कंडिशनिंग मिळते. फक्त तुम्ही हे लक्षात ठेवा की हेअर स्पा केल्यानंतर केसांवर जास्त उष्णतेची साधने वापरणे टाळा. हवं असेल तर सोप्या स्टेप्समध्ये हेअर स्पा घरीही देखील करता येतो. ताईच तुमच्या घरात स्टीम मशीन नसेल तर टॉवेल कोमट पाण्यात भिजवून केसांना तीन ते चार वेळा गुंडाळून ठेवावा, फक्त टॉवेल जास्त गरम होणार नाही याची काळजी घ्यावी.
केस मऊ बनवण्याचं कामही करतील या नैसर्गिक गोष्टी
नैसर्गिकरित्या केस मऊ ठेवण्यासाठी आणि हिवाळ्यात केसांचा कोरडेपणा कमी करण्यासाठी नैसर्गिक गोष्टींचाही तुम्हाला खूप उपयोग होऊ शकतो. यासाठी तुम्ही कोरफड जेलचा वापर करू शकता. त्यात मध, अंडी आणि खोबरेल तेल मिसळून हेअर मास्क देखील बनवता येतात. याशिवाय दही आणि अंड्याच्या मिश्रणानेही केसांवर आश्चर्यकारक परिणाम दिसून येतात. व तुमचे केस सॉफ्ट आणि चमकदार दिसू लागतात.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)