दिल्लीतील रुग्णालयांमध्ये मुलांमध्ये हात, पाय आणि तोंडाचे आजाराची (HFMD) प्रकरणे वाढत आहेत, ज्यानंतर विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली आहेत. अनेक शाळांनी मुलांच्या पालकांसाठी मार्गदर्शक सूचना (Guidelines) दिल्या आहेत. ज्यामध्ये असे म्हटले आहे की, हा एक सामान्य रोग आहे. परंतु, एक संसर्गजन्य विषाणूजन्य रोग आहे. जो सहसा 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना संक्रमित (infect children) करतो. परंतु, काहीवेळा मोठी मुले आणि प्रौढांना देखील याचा त्रास होऊ शकतो. HFMD रोगाची प्रकरणे पूर्वी नोंदवली गेली होती. यामध्ये मुलांना सौम्य ताप व अंगावर पुरळ (A rash on the body) आल्याचे दिसून आले. डॉक्टर सांगतात की, HFMD हा एक प्रकारचा विषाणूजन्य ताप आहे जो 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये पसरतो. जाणून घ्या, या आजाराची लक्षणे आणि उपचार.
एचएफएमडी या विषाणूजन्य संसर्गामुळे मुलांच्या हात, पाय, आणि तोंडावर लाल रंगाचे फोड दिसतात. काही मुलांना खूप तापही येतो. हा आजार एका बाधित मुलापासून दुस-या मुलाच्या संपर्कातून पसरतो. हे खूपच सांसर्गिक आहे. या विषाणूवर आतापर्यंत कोणतीही लस उपलब्ध नाही. तरी ते फारसे धोकादायक नसून, पालकांनी काळजी घ्यावी असे आवाहन तज्ज्ञांनी केला आहे.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, ज्या मुलांना या विषाणूची लागण झाली आहे त्यांच्या शरीरात पुरळ उठते, त्यांच्यापैकी काहींना सांधेदुखी, पोटदुखी, मळमळ, थकवा, उलट्या, जुलाब, खोकला, शिंका येणे, नाक वाहणे, तीव्र तापासह . आणि शरीर दुखण्याची तक्रार असते. जर एखाद्याला संसर्ग झाला असेल तर त्याने इतर लोकांच्या संपर्कात येऊ नये. त्यापेक्षा एकांतात राहणे आवश्यक आहे. या विषाणूजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाधितांची भांडी, कपडे व इतर वस्तू रोजच्या रोज वापरल्या जाव्यात. कोणीही संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात येऊ नये. कारण हा आजार एका मुलाकडून दुसऱ्या किंवा इतर कोणत्याही व्यक्तीमध्ये पसरू शकतो.
पूरळ पूर्णपणे बरी होईपर्यंत आणि किमान 24 तास ताप कमी होईपर्यंत पालकांनी मुलांना शाळेत पाठवू नये.
कोणत्याही मुलास पुरळ उठण्याची समस्या असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा. जर मुलाला या आजाराची लागण झाली असेल तर त्यावर त्वरित उपचार करा. मुलाच्या आहाराची विशेष काळजी घ्या.