भारतात पारंपारिक आणि घरगुती औषधांसाठी विविध औषधी वनस्पतींचा (Of medicinal plants) वापर केला जातो. तज्ज्ञांच्या मते, काही वनस्पतींमध्ये असे दैवी गुणधर्म असतात की, ते तुम्हाला जडलेले अनेक गंभीर आजार (Many serious illnesses) सहजपणे बरे करण्यास मदत करतात. गुळवेल हे असेच एक प्रभावी औषधी वनस्पती आहे, ज्याचे अनेक प्रकारच्या आजारांवर वर्षानुवर्षे सेवन केले जात आहे. विशेषतः कोरोनाच्या काळात शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी गुळवेल काढ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. गुळवेलचे आयुर्वेदात (Gulvel’s in Ayurveda) चमत्कारिक औषध म्हणून वर्णन केले आहे, त्याला ‘अमृता’ असेही म्हटले जाते, ज्याचा शाब्दिक अर्थ ‘जीवनाचे अमृत’ आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, गुळवेल नियमित सेवन केल्याने अनेक प्रकारच्या जुनाट आजार दूर होण्यास मदत होते. याच्या सेवनाने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवून तुम्हाला निरोगी आयुष्य जगता येते. यामध्ये असलेले औषधी गुणधर्म मानवी शरीरासाठी विशेष फायदेशीर आहेत. जाणून घ्या, गुळवेलचे औषधी गुणधर्म आणि फायदे.
पावसाळ्यात अनेक आजारांचा धोका वाढतो. विशेषतः पावसाळ्यात डेंग्यू-मलेरिया आणि चिकुनगुनिया यांसारख्या डासांमुळे होणारे आजार डोके वर काढतात.आयुर्वेद तज्ञांचे म्हणणे आहे की, गुळवेलच्या नियमित सेवनातून रोगप्रतिकारक शक्ती वाढवून आजारांपासून सुरक्षित ठेवण्यास मदत होतेच, परंतु या आजारांवर उपचार म्हणूनही गुळवेल हा प्रमुख घटकच उपयोगी औषध म्हणून वापरला जातो.
गुळवेलचे फायदे जाणून घेण्यासाठी केलेल्या प्रयोगशाळेतील अभ्यासात असे आढळून आले. की गुळवेल मध्ये प्रभावी अँटिऑक्सिडंट घटक आहेत, याचाच अर्थ ते ऑक्सिडेटिव्ह नुकसानापासून मानवी पेशींचे संरक्षण करण्यास मदत करतात. अशा परिस्थितीत जे लोक नियमितपणे गुळवेल सेवन करतात त्यांना स्तन, प्रोस्टेट सारखे अनेक प्रकारचे कर्करोग(कॅन्सर)ची लागण होण्याचा धोका इतर लोकांच्या तुलनेत खूपच कमी असतो. गुळवलेच्या काही संयुगामध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म असल्याचे शास्त्रज्ञांना आढळून आले आहेत.
गुळवेल सेवन केल्याने कसलीही ॲलर्जी होत नाही. त्यामूळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. सर्दी-खोकला, ताप असलेल्या 75 लोकांवर केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, गुळवेल सेवनाने या समस्यांची लक्षणे बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतात. ज्या लोकांना हवामानातील बदलासोबत सर्दी – कफ होऊ लागतात, अशांना गुळवेलचा काढा नियमितपणे घेणे फायदेशीर ठरू शकते.
औषधनिर्माण शास्त्रातील अभ्यासकांनी गुळवेलचे वर्णन प्रभावी अँटी-एजिंग औषधी वनस्पती म्हणून केले आहे. फ्लेव्होनॉइड्सने समृद्ध, हे औषध पेशींचे नुकसान कमी करून नवीन पेशींच्या वाढीस प्रोत्साहन देते. हे त्वचेचे पोषण करते आणि वृद्धत्वाची चिन्हे कमी करण्यासाठी शरीरात कोलेजनचे उत्पादन वाढवते. गुळवेलचे सेवन तुम्हाला वृद्धत्वाच्या लक्षणांपासून दीर्घकाळ दूर ठेवण्यास मदत करते.