Food | तेलकट त्वचेला चमकदार बनवेल ‘सोयाबीन’, आठवड्यातून एकदा सेवन करणे आवश्यक!

| Updated on: Feb 16, 2021 | 2:55 PM

सोयाबीनमुळे केवळ त्वचा सुधारत नाही, तर त्वचेचे आजार दूर करण्यात देखील ते प्रभावी आहेत. सोयाबीन स्वादिष्ट चवी सोबतच, चेहर्‍यावरील अनेक समस्या दूर करण्यात लाभदायी आहे.

Food | तेलकट त्वचेला चमकदार बनवेल ‘सोयाबीन’, आठवड्यातून एकदा सेवन करणे आवश्यक!
सोयाबीन
Follow us on

मुंबई : सोयाबीनमुळे केवळ त्वचा सुधारत नाही, तर त्वचेचे आजार दूर करण्यात देखील ते प्रभावी आहेत. सोयाबीन स्वादिष्ट चवी सोबतच, चेहर्‍यावरील अनेक समस्या दूर करण्यात लाभदायी आहे. असे अनेक घटक सोयाबीनमध्ये आढळतात, जे त्वचेच्या अनेक समस्यांपासून बचाव करण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. जर आपण याचे नियमितपणे सेवन केले, तर आपल्याला चमकदार आणि निरोगी चेहरा मिळेल (Health and beauty benefits of Soybean).

सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने, मॉलिव्डेनम, ट्रिप्टोफॅन, मँगनीज, लोह, ओमेगा-३, फॅटी अॅसिड्स, फॉस्फरस, फायबर, मॅग्नेशियम, तांबे, ‘ब’ व ‘क’ जीवनसत्त्व आणि काही प्रमाणात पोटॅशियम असते. सोयाबीनमध्ये स्निग्ध पदार्थ भरपूर प्रमाणात असतात आणि काबरेहायड्रेट्स कमी असतात. कोणत्याही कडधान्यापेक्षा किंवा तृणधान्यापेक्षा सोयाबीनमध्ये प्रथिनांचे प्रमाण काही पटीने जास्त असते.

तेलकट त्वचा

बहुतेक मुलींना तेलकट त्वचेची समस्या असते आणि उन्हाळ्यात त्यांची त्वचा त्यांना खूप त्रास देते. सोयाबीनचे सेवन केल्यास या समस्येपासून मुक्तता मिळू शकते.

सुरकुत्या

प्रत्येकालाच आपण तरूण दिसावे असे वाटत असते. परंतु, अशा परिस्थितीत चेहऱ्यावरील सुरकुत्या त्यांचे सौंदर्य खराब करतात. अशा वेळी सोयाबीनच्या सेवनाने ही समस्या खूप लवकर दूर करता येते. कारण सोयाबीनमुळे शरीरात इस्ट्रोजेन तयार होण्यास सुरुवात होते. इस्ट्रोजेन सुरकुत्या दूर करण्यास अतिशय प्रभावी आहे.

मजबूत नखे

मजबूत नखे म्हणजे हातचे सौंदर्य. जेव्हा नखे ​​तुटतात तेव्हा हातांचे सौंदर्य निघून जाते. अशा परिस्थितीत सोयाबीन खाल्ल्याने नखे मजबूत होतात (Health and beauty benefits of Soybean).

जाड आणि चमकदार केस

तुटणाऱ्या आणि गळणाऱ्या केसांमुळे आजकाल सगळेच अस्वस्थ आहेत. केस लांब, जाड आणि चमकदार बनवण्यासाठी सोयाबीनचे सेवन करणे आवश्यक आहे. सोयाबीनमध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने असतात, ज्यामुळे केस जाड आणि चमकदार बनतात.

चेहऱ्यावरचे डाग

चेहर्‍यावरील डाग चेहऱ्याचे सौंदर्य खराब करतात. अशा वेळी, हे डाग काढून टाकण्यासाठी तुम्ही सोयाबीनपासून बनवलेला फेसपॅक वापरू शकता.

सोयाबीनचे इतर काही फायदे :

– यातील आयसो फ्लेव्हन संयुगांमुळे शरीरातील चरबीच्या पेशींचे उत्पादन कमी होते म्हणजेच वजन कमी राहण्याच्या दृष्टीनं सोयाबीने उत्तम आहे.

– सोयाबीनमुळे खराब कोलेस्ट्रॉल कमी होते आणि चांगले वाढते. खराब कोलेस्ट्रॉल कमी झाल्याने उच्च रक्तदाबावर नियंत्रण मिळवण्यात मदत होते. कोलेस्ट्रॉल कमी करण्यामध्ये सोयाबीनमधील फायबर महत्त्वपूर्ण भूमिका निभावते.

– सोयाबीनमध्ये ओमेगा-३, फॅटी अॅसिड हे अँटीऑक्सिडंट आहेत. त्यामुळे रक्तात गाठी होण्याचे प्रमाण कमी होते. कमी कोलेस्ट्रॉलमुळे आणि रक्तात गाठी न होण्यामुळे हृदयविकाराला प्रतिबंध होतो.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Health and beauty benefits of Soybean)

हेही वाचा :