मुंबई : भारतीय खाद्य पदार्थात हिंगाला विशेष स्थान आहे. बर्याच पाककृती, लोणचे, चटणी इत्यादींमध्ये हिंग वापरले जाते. हिंगामध्ये पुष्कळ पोषकद्रव्ये, अँटीऑक्सिडेंट्स आणि प्रतिजैविक गुणधर्म असल्यामुळे संक्रामक रोगांपासून बचाव करण्यासाठी हे अतिशय उपयुक्त ठरते. चला जाणून घेऊया चिमुटभर हिंगाचे अनेक फायदे…(Health Benefits of Asafoetida aka hing)
हिंगामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, कॅरोटीन, राईबोफ्लेविन आणि भरपूर प्रमाणात प्रथिने, फायबर व कार्बोहायड्रेट असतात, जे आपल्या शरीराला निरोगी ठेवतात.
– गॅसच्या समस्येमध्ये अर्धा कप कोमट पाण्यात एक चिमूटभर हिंग टाकून प्यायल्याने ते फायदेशीर ठरते. एक ग्रॅम हिंग भाजून त्यात ओवा व काळे मीठ मिसळून सेवन केल्याने गॅसची समस्या कमी होते व आराम मिळतो.
– एक कप गरम पाण्यात एक चतुर्थांश चमचा सुकी आले पावडर, एक चिमूटभर मीठ आणि हिंग मिसळल्याने पोट फुगीच्या त्रासापासून आराम मिळतो.
– जर तुम्हाला वारंवार अपचन होत असेल, तर प्रत्येकी चमचा सुंठ, काळी मिरी, कढीपत्ता, ओवा आणि जिरे मिसळून वाटून त्याची बारीक पूड करा. एक चमचा तिळाच्या तेलामध्ये एक चिमूटभर हिंग भाजून यात घाला. शेवटी थोडे काळे मीठ मिसळा. हे चूर्ण भाताबरोबर खाल्ल्यास आराम मिळेल (Health Benefits of Asafoetida aka hing).
– केळी कुस्करून त्यात, गुळ आणि हिंग मिसळून खाल्ल्यानंतर उलट्या होणे, ढेकर येणे आणि उचकी येणे येणे थांबते.
– एक वाटी गरम पाण्यात थोडे हिंग घाला. या पाण्यात एक कपडा भिजवून पोट शेकवावे. जर आपल्याला पोटदुखी असेल किंवा अपचन असेल तर ओवा आणि मीठ एक चिमूटभर हिंग खावे.
– हिरड्यातून रक्तस्त्राव आणि दात किडले असल्यास एक कप पाण्यात हिंगाचा एक छोटा तुकडा आणि एक लवंग उकळवा. हे पाणी कोमट झाल्यावर, त्याने गुळण्या केल्यास आराम मिळेल.
– डाग, मुरुमांसारख्या त्वचेच्या समस्येमध्ये हिंगाचा वापर खूप उपयुक्त ठरतो. मुरुमांवर चिमूटभर हिंग पावडरमध्ये पाण्याट मिसळून बनवलेली पेस्ट मास्क प्रमाणे नियमितपणे लावावी.
– हिंग हे अँटिडायबेटिक पदार्थ आहे. हिंगाच्या वापरामुळे तुमच्या रक्तातील साखर नक्कीच नियंत्रणात राहण्यास मदत होऊ शकते.
– शरीराच्या कुठल्याही भागावर काटा टोचला असता तिथे हिंगाचा द्राव भरा. काही काळ थांबा, काटा स्वतःच बाहेर येईल आणि वेदना देखील त्वरित कमी होतील.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
(Health Benefits of Asafoetida aka hing)
फळं-भाज्यांच्या सालांमध्ये लपलेत भरपूर औषधी गुणधर्म! पाहा ‘या’ सालींचे फायदे…#healthtips | #VegetablePeel | #fruits https://t.co/MTOxYxPDBs
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 5, 2021