मुंबई : लाल-लाल बीटरूट आपल्या आरोग्यासाठी अनेक मार्गांनी एक महत्वाची भूमिका बजावते. आजकाल बीटरूट संपूर्ण वर्षभर बाजारात उपलब्ध असते. परंतु, हिवाळ्यातील बीटरूट अधिक चांगले असल्याचे मानले जाते. बीट हा लोह, जीवनसत्व, फॉलिक अॅसिड आणि खनिजांचा चांगला स्त्रोत आहे. बीटरूट शरीरातील हिमोग्लोबिन वाढवतात आणि रक्त शुद्ध करतात (Health Benefits of beetroot).
त्यात आढळणारे अँटिऑक्सिडेंटस (विशेषतः बीटागीन) शरीराला रोगांशी प्रतिकार करण्याची क्षमता देतात. याबरोबरच नायट्रेट, बेटेन, मॅग्नेशियम, फॉस्फरस, सोडियम, व्हिटामिन बी 1, बी 2 आणि सी हे तत्व बीटाचे औषधी गुणधर्म वाढवतात.
प्राचीन काळापासून, बीटरूटाचा वापर अनेक रोगांपासून बचाव करण्यासाठी केला जातो ज्यात ताप, बद्धकोष्ठता आणि त्वचेच्या समस्यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त बीट हे उच्च रक्तदाब (BP) देखील नियंत्रित ठेवते. बीट सक्रियपणे दृष्टि सुधारण्यासाठी आणि गर्भवती महिलांमधील फॉलिक अॅसिडची कमतरता पूर्ण करण्यासाचे कार्य करते. म्हणूनच डॉक्टर आपल्या दैनंदिन आहारात बीट समाविष्ट करण्याचा सल्ला देतात. बीटाची कोशिंबीर आणि सूप बनविण्याव्यतिरिक्त, हे सँडविचमध्ये, इतर भाज्यांबरोबर वापरले जाऊ शकते.
बीट नायट्रेट्सचा एक चांगला स्रोत आहे. याचे सेवन केल्यावर हे नायट्राट्स आणि एक गॅस नायट्रिक ऑक्साइड्समध्ये बदलते. हे दोन्ही गुण धमन्यांना रुंद करण्यात आणि ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत करते. संशोधनानुसार प्रत्येक दिवशी 500 ग्रॅम बीट खाल्ल्याने 6 तासांच्या आत ब्लड प्रेशर कमी होते.
वाढत्या दगदगीमुळे पौष्टिक खाण्याकडे लक्ष नसते. त्यामुळे अनेक त्रास उद्भवू शकतात. रोज सकाळी 1 कप बीटचा रस प्यायल्याने त्याचा खूप मोठा फायदा होता. यामुळे किडनी स्टोनची समस्या देखील दूर होते. रोज बीट खाल्यामुळे लीवरची सूज देखील कमी होते (Health Benefits of beetroot).
बीटमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर, फ्लोवेनॉइड्स आणि बेटासायनिन असते. बीटासायनिनमुळेच बीटाचा रंग लाल-जांभळा असतो. हे एक शक्तीवर्धक अँटीऑक्सीडेंट आहे. हे एलडीएल कॉलेस्ट्रॉलचे ऑक्सीकरण कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे ते धमन्यांमध्ये जमा होत नाही. यामुळे हृदविकाराचा धोका कमी होतो.
बदतल्या वातावरणामुळे आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे गॅसचा त्रास उद्भवतो. दोन चमचे बीटचा रस आणि मध एकत्र खाल्याने गॅसची समस्या दूर होते. बीटमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असल्याने पोटाशी संबंधिस समस्या दूर होतात. बीट रोज खाल्याने पोटाच्या समस्या दूर होतात.
बीटमध्ये मिनरल सिलिका असते. या तत्त्वामुळे शरीर कॅल्शियमला प्रभावी रुपात वापरता येऊ शकते. कॅल्शियम आपल्या दात आणि हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असते. यामुळे दिवसातुन दोन वेळा बीटचे ज्युस प्यायल्याने आस्टिओपरोसिस आणि हाडे व दातांच्या दुसऱ्या समस्या होणार नाही(Health Benefits of beetroot).
एका संशोधनात सिध्द झाले की, बीट थकवा दुर करण्यास मदत करते. याचे नायट्रेट तत्त्व धमिन्यांचा विस्तार करण्यास मदत करतात. यामुळे संपुर्ण शरीराला ऑक्सीजन योग्य प्रमात मिळते आणि एनर्जी वाढते. याव्यतिरिक्त बीटमधील आयर्नमुळे स्टॅमिना वाढण्यास मदत होते.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
(Health Benefits of beetroot)
Turmeric | बहुगुणकारी ‘कच्ची हळद’, शरीराला ‘या’ गंभीर आजारांपासून ठेवले दूर!https://t.co/Lxb4VlMkMk#HealthBenefits #RawTurmeric
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 22, 2020