मुंबई : हिरव्या भाज्या आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. या भाज्यांमध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक असतात. आज आम्ही तुम्हाला अशा भाजीबद्दल सांगणार आहोत, ज्याचा उपयोग तुम्ही अनेक प्रकारचे आजार टाळण्यासाठी करू शकता. या भाजीला सहजन, मुंगा, ड्रमस्टिक आणि आपल्याकडे ‘शेवग्याची शेंग’ म्हणून ओळखले जाते (Health Benefits of Drumstick).
शेवग्याच्या शेंगेमध्ये अनेक अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे आपल्याला हंगामी संक्रमणापासून वाचवतात. शेवग्याच्या पानांमध्ये व्हिटामिन बी 6, व्हिटॅमिन सी, व्हिटामिन ए, व्हिटामिन ई, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, झिंक यासारखे पोषक घटक असतात. चला तर, या शेवग्याची पाने आणि त्याच्या शेंगेपासून होणाऱ्या फायद्यांविषयी जाणून घेऊया.
मधुमेह
शेवगा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. मधुमेहाच्या रुग्णांसाठी शेवग्याची शेंग खूप फायदेशीर ठरते. या झाडाच्या शेंग, साल आणि पानामध्ये मधुमेहाला प्रतिबंधित करणारे गुणधर्म आहेत. याचे नियमित सेवन केल्याने मधुमेहावर नियंत्रण मिळते.
शेवग्याच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट्स आढळतात, ज्यामुळे जळजळ होण्याची समस्या दूर होते. तसेच या झाडाच्या पानांचे सेवन केल्यास हृदय निरोगी राहते (Health Benefits of Drumstick).
वाढते वजन कमी करण्यासाठी शेवग्याच्या भाजीचे सेवन करणे अतिशय लाभदायी ठरते. यात लठ्ठपणाविरोधी गुणधर्म आहेत जे वाढते वजन कमी करण्यात मदत करू शकतात.
यकृत हा आपल्या शरीराचा अविभाज्य भाग आहे. डमस्ट्रिक पानांमध्ये फ्लाव्हनॉल असते, जे हेपेटोप्रोटोक्टिव्ह म्हणून कार्य करते. यामुळे आले यकृत निरोगी राहते.
हेपेटोप्रोटोक्टिव्ह हा असा घटक आहे ज्यामुळे शरीरात अँटी ऑक्सिडंट तयार होतात. तसेच, शेवग्याच्या भाजीत ऑस्टिओपोरोटिक गुणधर्म आहेत जे ऑस्टिओपोरोसिसच्या धोक्यापासून आपल्या शरीराचा बचाव करण्यास मदत करतात(Health Benefits of Drumstick).
शेवग्याच्या पानाचा रस मधाबरोबर घेतल्यास डायरिया, जुलाबावर गुणकारी आहे. या रसामुळे पोटातील कृमींचा नाश होण्यास मदत मिळते.
शेवग्याच्या पानांचा रस त्वचेसाठी अँटीसेप्टिक म्हणूनही वापरला जातो. शेवग्याच्या ताज्या पानांचे लेप करून शरीराच्या ज्या भागावर सूज असेल तिथे बांधल्यास सूज कमी होते.
त्याचबरोबर डोकेदुखीचा त्रास उद्भविल्यास शेवग्याची पाने कपाळावर चोळून लावल्यास डोकेदुखी कमी करण्यास मदत होते.
(टीप : डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सेवन करू नये.)
(Health Benefits of Drumstick)
Warm Water Benefits | केवळ वजन नियंत्रणच नव्हे तर, गरम पाण्यामुळे शरीराला होतील अनेक फायदे!https://t.co/z1w6xfCCBd#WarmWater #healthylifestyle #health
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 17, 2020