मुंबई : मसाल्यातील ‘बडीशेप’ हा घटक जवळजवळ प्रत्येक घरात असतो. बडीशेप मुख्यतः माऊथ फ्रेशनर अर्थात मुखवास म्हणून वापरली जाते. बडीशेपच्या गोड चव आणि सुगंधामुळेच लोक ती माऊथ फ्रेशनर म्हणून वापरतात. बडीशेप विविध पदार्थांची चव वाढवण्यासोबतच औषध म्हणून देखील वापरली जाते (Health benefits of fennel seeds).
यात असलेले फायबर आणि बरेच पौष्टिक घटक आपल्या पोटाच्या आरोग्यासाठी खूप चांगले मानले जातात. परंतु, दुधाबरोबर बडीशेप घेतल्यास आपल्याला आरोग्याचे आणखी बरेच फायदे मिळतात. हे बडीशेप दूध बनवणे अतिशय सोपे आहे. यासाठी एका ग्लास दुधात एक चमचा बडीशेप घाला आणि हे दूध चांगले उकळा. कोमट झाल्यानंतर दूध प्या. चला तर, या बडीशेप दुधाचे अनेक आरोग्यदायी फायदे जाणून घेऊया…
बडीशेपमध्ये असणाऱ्या नैसर्गिक तेलामुळे अपचन, आतड्यांची सूज आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यास मदत होते. म्हणूनच बडीशेप दूध हे पोटातील आजार बरे करण्यासाठी खूप प्रभावी मानले जाते. यात असलेल्या अॅस्ट्रॅगल आणि अॅनिथोलमुळे, हे गॅस, वेदना आणि जठरासंबंधी विकार यांसारख्या पोटाच्या आजारांसाठी एक प्रभावी औषध मानले जाते. मसालेदार जेवणामुळे होणारी जळजळ आणि आतड्यांची सूज कमी करण्यासाठी बडीशेप प्रभावीपणे कार्य करते.
जर तुम्हाला जाडेपणाची समस्या असेल तर तुम्ही आजपासून बडीशेप खायला सुरूवात करा. दोन कप पाण्यात एक चमचा बडीशेप घालून उकळून घ्या आणि हे पाणी दिवसातून दोन ते तीन वेळा प्या. यामुळे तुमचं अपचन दूर होईल आणि तसंच वजन कमी होण्यासही मदत होईल (Health benefits of fennel seeds).
यात असलेले आवश्यक तेले आणि फायबर सारखी पोषक तत्त्वे आपल्या शरीरातून टॉक्सिक घटक काढून टाकण्यास मदत करतात, म्हणूनच बडीशेप रक्त शुद्धिकरणासाठी देखील उपयुक्त आहेत.
जर आपल्याला कमी दिसत असेल किंवा आपले डोळे अशक्त झाले असतील, तर मूठभर बडीशेप आपल्यासाठी वरदान ठरू शकते. बडीशेपमध्ये व्हिटामिन ए असते, जे डोळ्यांच्या दृष्टीस उपयुक्त आहे. दररोज 5 ते 6 ग्रॅम बडीशेप खाल्ल्याने यकृत आणि दृष्टी सुधारू शकते.
यातील फायबर, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हृदयरोगाचा धोका देखील कमी करते. तसेच, बडीशेप शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी देखील खूप प्रभावी आहे.
बडीशेप नियमितपणे सेवन केल्याने आपल्या शरीरास झिंक, कॅल्शियम आणि सेलेनियमसारखे खनिजे मिळतात जे शरीरात हार्मोन्स आणि ऑक्सिजनचा पुरवठा संतुलित राखण्यास मदत करतात. त्याचा कूलिंग इफेक्ट चेहऱ्यावरही चमक आणतो.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे बंधनकारक आहे.)
(Health benefits of fennel seeds)
हंगामी सर्दी-खोकल्यावर रामबाण उपाय ‘काळीमिरी’, जाणून घ्या याचे महत्त्वाचे फायदे…https://t.co/pe3zkVHUt4#BlackPepper #health
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 25, 2020