फळं-भाज्यांच्या सालांमध्ये लपलेत भरपूर औषधी गुणधर्म! पाहा ‘या’ सालींचे फायदे…

| Updated on: Jan 05, 2021 | 2:25 PM

जपानसह जगातील विविध देशांमध्ये केलेल्या संशोधनात फळ आणि भाज्यांच्या साली या नैराश्यापासून हृदयविकाराच्या समस्येवर गुणकारी ठरत असल्याचे दिसून आले आहे.

फळं-भाज्यांच्या सालांमध्ये लपलेत भरपूर औषधी गुणधर्म! पाहा ‘या’ सालींचे फायदे...
Follow us on

मुंबई : भाज्या किंवा फळे खाताना बऱ्याचदा आपण त्यांच्या साली टाकून देतो. मात्र, आपल्याला या सालीमध्ये असलेले औषधी गुणधर्म कळल्यास पुढच्या वेळी आपण नक्की या सालांना काळजीपूर्वक जपून ठेवू. जपानसह जगातील विविध देशांमध्ये केलेल्या संशोधनात फळ आणि भाज्यांच्या साली या नैराश्यापासून हृदयविकाराच्या समस्येवर गुणकारी ठरत असल्याचे दिसून आले आहे. इतकेच नव्हे तर त्वचा मऊ, डाग मुक्त आणि चमकदार ठेवण्यात देखील या साली महत्त्वाची भूमिका बजावतात (Health benefits of fruits and vegetables peel).

जाणून घ्या सालींचे फायदे :

केळीचे साल : नैराश्य, मोतीबिंदू

तैवानच्या चुंग शान मेडिकल युनिव्हर्सिटीच्या संशोधनात केळीच्या सालामध्ये फील-गुड हार्मोन सेरोटोनिन आढळल्याचे नोंदवले गेले आहे. या हार्मोनमुळे अस्वस्थता, तसेच नैराश्याची भावना कमी होते. केळ्याच्या सालीत ल्युटीन नावाचा अँटीऑक्सिडंट देखील आढळला आहे. हा घटक अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून डोळ्यांत असलेल्या पेशींचे संरक्षण करून मोतीबिंदू होण्याचा धोका कमी करतो.

कसा वापर कराल? : केळीची साले स्वच्छ करून दहा मिनिटे पाण्यात उकळवा. पाणी थंड झाल्यावर गाळून प्या.

 

नाशपतीचे साल : पोट आणि यकृत समस्या

यूके स्थित रॉयल सोसायटी ऑफ मेडिसिनच्या संशोधनानुसार, नाशपातीच्या सालामध्ये व्हिटामिन-सी आणि फायबर व्यतिरिक्त ब्रोमेलिनचा एक उत्कृष्ट घटक आढळतो. या साली चयापचय प्रक्रिया सुधारून, पोटातील मृत मेदयुक्त पेशींना शरीरातून काढून टाकतात. तसेच, शरीरात हा घटक यकृताच्या समस्यांपासून देखील शरीराचा बचाव करतो.

कसा वापर कराल? : जर, आपल्याला सालासह नाशपती खाण्यास आवडत नसेल तर, आपण रस, शेक किंवा सूप करून त्याचे सेवन करून शकतो (Health benefits of fruits and vegetables peel).

 

लसूण : हृदयरोग

जपानी जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार लसणाच्या सालींमध्ये फिनायलप्रॉपेनॉयड अँटिऑक्सिडंट आढळल्याचे म्हटले आहे. हा घटक खराब कोलेस्टेरॉल काढून टाकतो, तसेच रक्तदाब नियंत्रणात ठेवतो. ज्यामुळे हृदय निरोगी राहते.

कसा वापर कराल? : दररोज सकाळी रिकाम्या पोटी दोन लसूण पाकळ्या साल न काढता चावून खा.

 

संत्र-मोसंबी : हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग

रॉयल सोसायटी ऑफ मेडिसिनच्या आणखी एका संशोधनात असे दिसून आले आहे की संत्र-मोसंबी सारख्या लिंबूवर्गीय फळांच्या सालांमध्ये मोठ्या प्रमाणात सुपर-फ्लाव्होनॉइड असते. यामुळे बॅड कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते. हे अँटीऑक्सिडंट रक्तप्रवाह सुरळीत करून, हृदयरोगाला दूर ठेवते.

कसा वापर कराल? : सूप किंवा भाज्यांमध्ये किसून वापर करता येतो. केक आणि मफिनमध्ये किंवा रस बनवून सेवन करता येईल.

(Health benefits of fruits and vegetables peel)

(टीप : कुठल्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

हेही वाचा :