उन्हाळ्यात तुमच्या आहारात ‘या’ सुपरफूड्सचा करा समावेश, हायड्रेशनसोबतच मिळेल चमकदार त्वचा

| Updated on: Mar 16, 2025 | 9:27 PM

आज आम्ही तुम्हाला अशाच काही सुपरफूड्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांचा तुमच्या आहारात समावेश करून तुम्ही उन्हाळ्यातही तंदुरुस्त आणि फ्रेश दिसाल. चला तर मग जाणून घेऊयात...

उन्हाळ्यात तुमच्या आहारात या सुपरफूड्सचा करा समावेश, हायड्रेशनसोबतच मिळेल चमकदार त्वचा
skin care
Image Credit source: IndiaPix/IndiaPicture/Getty Images
Follow us on

उन्हाळा येताच आपल्या शरीराच्या गरजा बदलू लागतात. कारण या काळात आपले शरीर कितपत हायड्रेट राहील हे सर्वात जास्त महत्वाचे आहे. या कडक उन्हाळ्यात शरीराला सर्वात जास्त हायड्रेशनची आवश्यकता असते, जेणेकरून तुमच्या शरीराला पाण्याची कमतरता भासू नये. जर तुम्हाला जास्त उष्णतेचा त्रास होत असेल, म्हणजेच तुमला खूप घाम येत असेल, तर तुम्ही सतत पाणी पित राहावे. पाणी प्यायल्याने तुमची ऊर्जा पातळी संतुलित राहते. या ऋतूत योग्य आहार तसेच पाण्याचे योग्य प्रमाण ठेवल्यास उष्णता सहज सहन करता येतेच, शिवाय ताजेपणा आणि आरोग्यही टिकवून ठेवता येते.

आज आम्ही तुम्हाला अशाच काही सुपरफूड्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांचा तुमच्या आहारात समावेश करून तुम्ही उन्हाळ्यातही तंदुरुस्त आणि उत्साही राहाल.

काकडीचे सेवन करा

उन्हाळ्याचा दिवसात तुमच्या आहारात काकडीचा समाविष्ट करणे हा चांगला पर्याय आहे. कारण काकडी हे या दिवसात एक उत्तम सुपरफूड ठरू शकते. कारण यात सुमारे 95 % पाणी असते, जे शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. काकडी खाल्ल्याने पोटाची जळजळ आणि उष्णता कमी होते आणि शरीर थंड राहते. याशिवाय, ते विषारी पदार्थ काढून टाकून शरीराला डिटॉक्सिफाय करण्यास मदत करते. काकडीचे सेवन तुम्ही सॅलड, रायता किंवा ज्यूसच्या स्वरूपात समाविष्ट करू शकता. काकडी केवळ ताजेपणा देत नाही तर वजन कमी करण्यास देखील मदत करते.

टरबूज

उन्हाळ्याच्या दिवसात टरबूज हे फळ सर्वात जास्त खाल्ल्या जाणाऱ्या फळांपैकी एक आहे आणि कारण त्यात 92% पाणी असते. अशातच टरबूज केवळ शरीराला थंड आणि हायड्रेट करत नाही तर त्याचे सेवन शरीरातील पाण्याची कमतरता देखील पूर्ण करते, ज्यामुळे तुम्हाला ऊर्जावान वाटते. याशिवाय टरबूजमध्ये असलेले लायकोपीन, व्हिटॅमिन ए आणि सी त्वचा आणि शरीरासाठी फायदेशीर आहेत. उन्हाळ्यात दररोज याचे सेवन केल्याने शरीराला आराम मिळतो आणि उष्माघाताचा धोकाही कमी होतो.

सत्तूचे सेवन

सत्तू सरबत उन्हाळ्यात एक उत्तम ऊर्जा वाढवणारा पदार्थ आहे . हे भाजलेल्या चण्यांपासून बनवले जाते, जे प्रथिने आणि फायबरचा उत्कृष्ट स्रोत आहे. सत्तूचे सेवन केल्याने शरीराला बराच काळ ऊर्जा मिळते आणि पचनक्रिया देखील सुधारते. पाणी, लिंबू आणि थोडे मीठ मिसळून ते प्यायल्याने शरीर थंड होते आणि उन्हाळ्यात येणारा थकवा आणि अशक्तपणा दूर होण्यास मदत होते.

लिंबू पाणी

उन्हाळ्यात लिंबू पाण्यापेक्षा चांगला सुपर पेय असू शकत नाही. यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे शरीराला ऊर्जा देते आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत करते. तसेच तुम्ही या दिवसात नियमित लिंबू पाणी प्यायल्यास शरीराला हायड्रेट ठेवते आणि पचन सुधारते तसेच शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. उन्हाळ्यात लिंबू पाणी प्यायल्याने उष्माघातापासून बचाव होतो आणि तुम्ही ताजेतवाने राहता.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)