Health care: हिमोग्लोबिनची पातळी सुधारू शकते, ‘या’ गोष्टींचा करा आहारात समावेश

| Updated on: Jul 21, 2022 | 10:15 PM

हिमोग्लोबिन आपल्या शरीरात ऑक्सिजन वाहून नेण्याचे काम करते आणि जर त्याची कमतरता शरीरात असेल तर अनेक समस्या उद्भवू शकतात. आपण काही पदार्थांचा आहारात समावेश केल्यास, हिमोग्लोबिनची पातळी सुधारू शकते.

Health care: हिमोग्लोबिनची पातळी सुधारू शकते, ‘या’ गोष्टींचा करा आहारात समावेश
Follow us on

हिमोग्लोबिन हे तुमच्या रक्तातील प्रथिन आहे. हे लाल रक्तपेशींमध्ये (In red blood cells) आढळते. या पेशी शरीराभोवती ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी जबाबदार असतात. ऑक्सिजन वाहून नेण्याव्यतिरिक्त, हिमोग्लोबिन (Hemoglobin) कार्बन डायऑक्साइड पेशींमधून आणि फुफ्फुसात वाहून नेतो. त्यामुळे श्वास सोडताना कार्बन डायऑक्साइड बाहेर पडतो. कमी हिमोग्लोबिनमुळे शरीराला ही कार्ये करणे कठीण होऊ शकते. पुरुषांमध्ये हिमोग्लोबिनची सामान्य पातळी साधारणतः १३.५-१७.५ ग्रॅम प्रति डेसीलिटर असते. तर स्त्रियांमध्ये ही पातळी 12.0 – 15.5 ग्रॅम प्रति डेसीलीटर असल्यास, हिमोग्लोबिनचे प्रमाण सामान्य मानले जाते. यापेक्षा कमी अशक्तपणा, थकवा आणि श्वासोच्छवासाचा त्रास होऊ शकतो. गर्भधारणा आणि मासिक पाळी यांमुळे पुरुषांपेक्षा महिलांना हा त्रास जास्त होतो. कमी हिमोग्लोबिन असलेल्या नागरिकांची संख्या भारतात, विशेषत: महिलांमध्ये अधिक आहे, त्यामुळे निरोगी हिमोग्लोबिन पातळी सुनिश्चित करण्यासाठी तुम्ही या पदार्थांचा आहारात समावेश (Inclusion in diet) केला पाहिजे.

राजगिरा

औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या राजगिरामध्ये लोहाचे प्रमाण खूप जास्त असते. याशिवाय यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी आणि प्रोटीन यांसारखे अनेक पोषक घटक असतात. त्यामुळे आठवड्यातून एकदा राजगिरा नक्की सेवन करा.
लाल भाजी : लाल हिरव्या भाज्या खाणे आरोग्यदायी आहे. यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. पोषणतज्ञ म्हणतात की लाल हिरव्या भाज्या लोहाचा चांगला स्रोत आहेत. हे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण आणि लाल रक्तपेशींची संख्या वाढविण्यात मदत करते.

खजूर

शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी खजूरचा वापर प्राचीन काळापासून केला जातो. हा लोहाचा सर्वोत्तम स्त्रोत आहे आणि या कारणास्तव हिमोग्लोबिनची पातळी सुधारली जाऊ शकते.

मनुका

ज्या लोकांमध्ये हिमोग्लोबिनची पातळी कमी असते, डॉक्टर त्यांना मनुका खाण्याचा सल्ला देतात. हे लाल रक्ताचे सेल तयार करण्यास मदत करते आणि त्याची चव देखील चांगली असते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही दररोज रात्री भिजवलेल्या मनुका खाऊ शकता. मनुका पाणी पिण्यास विसरू नका.

तीळ

आयुर्वेदात तिळाचे विशेष महत्त्व सांगितले आहे. लोहाने समृद्ध असलेल्या या बियांमध्ये तांब्यासारखे पोषक तत्व देखील असतात. हे पोषक तत्व हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.