जीन्स घालणं ही आता एक फॅशन झाली आहे. मुलच नव्हे तर मुलींमध्येही जीन्स घालण्याची फॅशन वाढली आहे. कोणत्याही वयातील व्यक्ती असो, प्रत्येकाला जीन्स घालयला आवडते. फॅशनच्या दुनियेत जीन्सला नेहमीच खास स्थान राहिलं आहे. 90 च्या दशकातील बॅगी जीन्सपासून आजच्या रिप्ड जीन्सपर्यंतचा जीन्सचा प्रवास राहिला आहे. पण, जीन्स नियमितपणे घालण्यामुळे होणाऱ्या आरोग्य समस्यांबद्दल अनेकांना माहिती नाही. कधी माहिती असली तरी त्याची तीव्रता अनेकांना समजलेली नाही. खास करून जीन्स घालणाऱ्या महिलांना कोणता त्रास होऊ शकतो, यावर आज आपण प्रकाश टाकणार आहोत.
फिट जीन्स म्हणजेच तंग जीन्स. जीन्सचा हा प्रकार आरोग्यासाठी मोठा धोकादायक मानला जातो. टाईट जीन्स बराच वेळ घातल्यामुळे घामाचा गंध थांबून मूत्रमार्गात इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. हे फक्त उन्हाळ्यातच नव्हे, तर पावसाळ्यातही होऊ शकते. कारण पावसाळ्यात घाम साचून राहतो आणि त्यामुळं त्वचेच्या इन्फेक्शनची शक्यता वाढते.
टाईट जीन्सचे दीर्घकाळ वापरल्यामुळे शरीरातील रक्तप्रवाहावरही परिणाम होतो. रक्तप्रवाह कमी होणामुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याची शक्यता देखील वाढते. त्यामुळे जर ती नियमितपणे घातली तर ती आपल्या स्नायूंवर दबाव आणते. तसेच, पाय दुखणे आणि विविध समस्या उद्भवू शकतात.
कलर डाईंग किंवा डाय केलेली जीन्स वापरणे देखील आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. जीन्सला वेगवेगळे रंग देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रासायनिक पदार्थांमध्ये अनेक प्रकारच्या साइड इफेक्ट्स होऊ शकतात. यामुळे अॅलर्जी, इन्फेक्शन इत्यादी समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
टाईट कपडे नियमितपणे घातल्यामुळे प्रजननक्षमतेवर गंभीर परिणाम होऊ शकतो, असे अनेक संशोधनांनी दाखवून दिले आहे. टाईट जीन्स घालणाऱ्या महिलांना वल्वोडायनिया होण्याची शक्यता अधिक असते. या रोगामुळे त्यांच्या गुप्तांगांमध्ये तीव्र वेदना, इन्फेक्शन इत्यादी समस्यांचे समाधान होऊ शकते.
जीन्सच्या ऐवजी नेहमीच शालीन कापडाचे कपडे घालणे उत्तम असते. मात्र, अनेकजण फॅशनला अधिक महत्त्व देतात. म्हणूनच, नियमितपणे जीन्स घालण्याऐवजी आठवड्यात एक किंवा दोन वेळा घालणे चांगले. एक दिवस संपूर्ण दिवस जीन्स घालल्यानंतर त्याला धुण्याचा प्रयत्न करा आणि त्यानंतरच दुसऱ्या दिवशी ते परत वापरा.