मुंबई : आपल्या रोजच्या आहारात टोमॅटो जवळजवळ प्रत्येक भाजीमध्ये टाकला जातो. भाजी किंवा आमटी शिवाय कोशिंबीरी, सॉस आणि सूप म्हणून देखील टोमॅटोचा वापर केला जातो. याव्यतिरिक्त एक नैसर्गिक सौंदर्य उत्पादन म्हणून देखील तो उपयुक्त ठरतो. टोमॅटोमध्ये व्हिटामिन सी, लाइकोपीन आणि पोटॅशियम हे घटक पर्याप्त प्रमाणात आढळतात (Health side effects of tomato).
या व्यतिरिक्त कोलेस्ट्रॉल कमी करणारे घटकही टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात असतात. टोमॅटोचे अनेक फायदे नेहमीच सांगितले जातात. परंतु, टोमॅटोच्या सेवनामुळे शरीराचे नुकसानही होते, हे कदाचित आपल्याला ठाऊक देखील नसेल. कोणत्याही गोष्टीचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने आपल्या शरीरास हानी पोहचू शकते. टोमॅटोवर देखील हाच नियम लागू आहे. चला तर जाणून घेऊया टोमॅटोमुळे होणारे शारीरिक नुकसान…
– टोमॅटोचे जास्त सेवन केल्याने अॅसिडिटीची समस्या निर्माण होऊ शकते. कारण टोमॅटोमध्ये भरपूर अॅसिड असते आणि त्याचे अधिक सेवन केल्याने तुमच्या शरीरातील अॅसिडचे प्रमाण देखील वाढते आणि यामुळे अॅसिडिटी समस्या निर्माण होऊ शकते.
– टोमॅटोच्या बीया आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय हानिकारक ठरतात. जर, टोमॅटोच्या बियांचे आपण अतिप्रमाणात सेवन केले तर, आपल्या शरीरात मातीचे खडे तयार होऊ शकतात. यामुळे यकृतात आणि मूत्रपिंडात खडे तयार होतात आणि त्यामुळे शरीराचे प्रचंड नुकसान होते.
– टोमॅटोमध्ये टरपिन्स नावाचा घटक असतो आणि तो आपल्या शरीरात दुर्गंधी वाढवण्यास मदत करू शकतो. पचन दरम्यान त्याचे विघटन शरीराच्या दुर्गंधीस कारणीभूत ठरू शकते.
– ज्यांना गॅसची समस्या आहे, त्यांनी टोमॅटोचे सेवन कमी करावे. टोमॅटोमुळे पोटात गॅस तयार होऊ शकतो.
– आजकाल सेंद्रिय टोमॅटोऐवजी इंजेक्शन किंवा केमिकल वापरुन पिकवलेले टोमॅटो बाजारात विक्रीस उपलब्ध आहेत. यांचे सेवन आरोग्यासाठी खूप धोकादायक आहे. यामुळे आपल्याला अस्वस्थता, रक्तदाब आणि आरोग्याच्या इतर समस्या देखील उद्भवू शकतात (Health side effects of tomato).
टोमॅटो हे चवीला काहीसे आंबट असतात, कारण यामध्ये सायटीक अॅसिड असते. याशिवाय टोमॅटोमध्ये प्रोटीन, व्हिटामिन्स, मिनरल्स आणि फायबरची मात्राही भरपूर असते. हे व्हिटामिन ए, व्हिटामिन सी, व्हिटामिन ई आणि व्हिटामिन के चा खूप चांगला स्त्रोत आहे. ही सर्व व्हिटामिन्स आरोग्यासाठी खूप चांगली मानली जातात. व्हिटामिन एची मात्रा असल्याने टोमॅटो डोळ्यांसाठी खूपच फायदेशीर आहे.
टोमॅटोमध्ये पोटॅशिअम आणि मँगनीज भरपूर प्रमाणात असते. तसंच टोमॅटो कॅल्शिअम, आर्यन, कॉपर, मॅग्नेशिअम, फॉस्फरस आणि झिंक यासारख्या तत्त्वांनी युक्त असतो. टोमॅटोमध्ये अँटीऑक्सिडेंट गुणही आढळतात, जे कॅन्सर आणि हृदयरोगासारख्या गंभीर रोगांपासून बचाव करण्यासाठी सहायक असतात. टोमॅटोमधील लाल रंग हा त्यातील लाइकोपीनमुळे प्राप्त होतो, जे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. याच कारणामुळे कच्चा टोमॅटो पिकल्यानंतर अजून प्रभावकारक ठरतो.
(टीप : कोणत्याही प्रकारच्या सेवानापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
(Health side effects of tomato)
Amla Side effects | आवळ्याचे अधिक सेवन ठरू शकते शरीरासाठी हानिकारक, वाचा याचे दुष्परिणाम…#AmlaSideeffects | #Amla | #food | #health https://t.co/AKAbYScVke
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 26, 2021